Sudden death in sleep: झोपेत अचानक मृत्यू होण्यामागची कारणं कोणती? धोका टाळण्यासाठी शरीरातील 'हे' बदल नक्की ओळखा

Sudden death in sleep causes: झोपेत असताना अचानक मृत्यू (Sudden Death in Sleep) होण्याच्या घटना अलीकडच्या काळात वाढल्या आहेत. हे मृत्यू अनेकदा हृदयविकार किंवा श्वसनक्रियेच्या गंभीर समस्यांशी जोडलेले असतात.
Sudden death in sleep causes
Sudden death in sleep causessaam tv
Published On
Summary
  • झोपेत मृत्यू हे गंभीर आजारांचा इशारा

  • हृदयविकार हे प्रमुख कारण

  • स्लीप एप्नियामुळे ऑक्सिजन कमी होतो

आपल्याला अनेकदा अशा बातम्या ऐकायला मिळतात की, एखाद्या व्यक्तीचा झोपेत मृत्यू झाला. अनेकजण म्हणतात की झोपेत मृत्यू होणं ही सर्वांत शांत जाण्याची पद्धत आहे. मात्र वैद्यकशास्त्र सांगतं की अशा प्रकारचा मृत्यू बहुतेक वेळा गंभीर आजारांकडे इशारा करतो. हृदय, फुफ्फुसे किंवा मेंदूशी संबंधित समस्या झोपेत अचानक मृत्यूला कारणीभूत ठरतात. चला तर पाहूया, झोपेत मृत्यू का होतो आणि त्यामागची मुख्य कारणं कोणती आहेत.

हृदयविकाराचा झटका

हृदयविकारतज्ज्ञांच्या मते, झोपेत मृत्यू होण्याचं सर्वांत मोठं कारण म्हणजे अचानक हृदय बंद पडणं, ज्याला सडन कार्डियाक अरेस्ट (SCA) म्हणतात. या स्थितीत हृदयाची धडधड अचानक थांबते. कोरोनरी आर्टरी डिसीज, अनियमित धडकन (Arrhythmia) किंवा हृदयाच्या झडपांमधील दोष यामुळे ही समस्या उद्भवते.

दिल्लीतील कार्डियोलॉजिस्ट डॉ. प्रमोद कुमार यांनी एका वेबसाईटशी बोलताना सांगितलं की, "जर हृदयविकार वेळेत ओळखला गेला आणि रुग्णाने नियमित तपासण्या केल्या, तर झोपेत हृदयविकाराने होणारा मृत्यू बऱ्याच प्रमाणात टाळता येऊ शकतो."

Sudden death in sleep causes
Early symptoms of brain cancer: मेंदूचा कॅन्सर होण्यापूर्वी शरीरात सुरुवातीला होतात ४ मोठे बदल; दुर्लक्ष करणं ठरेल जीवघेणं

ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप एप्निया

ही एक गंभीर झोपेची समस्या आहे ज्यामध्ये झोपेत श्वास मधूनमधून थांबतो. त्यामुळे शरीरातील ऑक्सिजनची पातळी कमी होते आणि हृदयावर ताण वाढतो. यामुळे हृदयविकाराचा झटका, स्ट्रोक आणि अचानक मृत्यू होऊ शकतो. सीपॅप (CPAP) थेरपी, वजन नियंत्रण आणि मद्यपान व धूम्रपान टाळणं यामुळे OSAचा धोका कमी होतो आणि झोपेची गुणवत्ता सुधारते.

मधुमेह

टाइप-१ डायबिटीज असलेल्या रुग्णांचा रक्तातील साखर रात्री झोपेत खूप खाल्ली गेल्यास अचानक मृत्यू होऊ शकतो. याला डेड इन बेड सिंड्रोम असं म्हणतात. एंडोक्रायनॉलॉजिस्ट सुचवतात की, अशा रुग्णांनी झोपण्यापूर्वी साखरेची पातळी तपासावी आणि डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणे इन्सुलिनचं डोस घ्यावा.

Sudden death in sleep causes
Eye cancer symptoms: डोळ्यांमध्ये 'हे' बदल दिसले तर समजा कॅन्सर झालाय; पाहा डोळ्यांमध्ये गाठी झाल्यास कोणती लक्षणं दिसतात?

एपिलेप्सी आणि SUDEP

एपिलेप्सी असलेल्या रुग्णांना Sudden Unexpected Death in Epilepsy (SUDEP) चा धोका असतो, जो बहुतेक वेळा झोपेत होतो. न्यूरॉलॉजिस्टच्या म्हणण्याप्रमाणे, औषधं वेळेत घेणं, झटक्यांवर लक्ष ठेवणारी मॉनिटरिंग डिव्हाइस वापरणं आणि डॉक्टरांचा नियमित सल्ला घेणं यामुळे SUDEP चा धोका कमी होऊ शकतो.

Sudden death in sleep causes
Liver cancer early symptoms: लिव्हरचा कॅन्सर सुरू होण्यापूर्वी शरीरात दिसतात मोठे ७ बदल; सामान्य समजून दुर्लक्ष करू नका

स्ट्रोक आणि इतर मेंदूशी संबंधित समस्या

जास्त रक्तदाब, मेंदूत रक्तप्रवाह रोखणारा ब्लॉकेज किंवा ब्रेन अ‍ॅन्युरिझम यामुळे रात्री स्ट्रोक येऊ शकतो. तज्ज्ञांच्या म्हणण्याप्रमाणे, रक्तदाब नियंत्रणात ठेवणं, कोलेस्ट्रॉलकडे लक्ष देणं आणि नियमित आरोग्य तपासण्या करणं हे स्ट्रोकपासून वाचण्याचा सुरक्षित मार्ग आहेत.

Sudden death in sleep causes
Early signs of heart disease: शरीरात दिसणारे 'हे' ८ बदल वेळीच ओळखा; हृदयाच्या आजारांचा धोका दर्शवतात लक्षणं, दुर्लक्ष नकोच!

श्वसनाच्या समस्या

सीओपीडी (COPD), तीव्र दमा किंवा फुफ्फुसातील संसर्गामुळे झोपेत श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो. अशा रुग्णांनी औषधं, इन्हेलर वेळेत वापरावं आणि प्रदूषणापासून दूर राहावं, असा डॉक्टरांचा सल्ला असतो.

Sudden death in sleep causes
Early signs of diabetes: शरीरात 'हे' ५ मोठे बदल दिसले तर समजा डायबेटीज झालाय; लक्षणं पाहून दुर्लक्ष करू नका

धोका वाढवणारे घटक

  • धूम्रपान

  • मद्यपान

  • लठ्ठपणा

  • अनियमित झोप

हे सर्व घटक हृदय आणि फुफ्फुसाच्या आजारांचा धोका वाढवतात आणि झोपेत मृत्यू होण्याची शक्यता अधिक करतात.

Sudden death in sleep causes
Cancer Symptoms: शरीरात होणाऱ्या 5 मोठ्या बदलांकडे चुकूनही दुर्लक्ष करू नका; विविध कॅन्सरची असू शकतात लक्षणं
Q

झोपेत मृत्यू का होतो?

A

हृदय, फुफ्फुस किंवा मेंदूच्या समस्यांमुळे.

Q

स्लीप एप्निया कसा धोकादायक आहे?

A

श्वास थांबल्याने ऑक्सिजन कमी होतो.

Q

मधुमेहामुळे झोपेत मृत्यू होऊ शकतो का?

A

होय, रक्तातील साखर खूप कमी झाल्यास.

Q

एपिलेप्सी असलेल्यांना कोणता धोका असतो?

A

SUDEP मुळे झोपेत अचानक मृत्यू होऊ शकतो.

Q

झोपेत मृत्यू टाळण्यासाठी काय करावे?

A

नियमित तपासणी, आरोग्यदायी जीवनशैली जोपासावी.

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com