कोरोना व्हायरच्या आजाराला देशाने तोंड दिल्यानंतर पुन्हा एकदा नव्या व्हायरसने तोंड वर काढले आहे. केरळ जिल्ह्यात नुकत्याच्या निपाह व्हायरसमुळे दोन व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे तेथील सरकार अलर्ट झाले आहे. अशातच या आजाराची लक्षणे कोणती हा आजार कसा होतो याविषयी जाणून घेऊया.
WHO च्या मते निपाह व्हायरसी लक्षणे ही संसर्ग आणि श्वसनामार्फत संक्रमण होतात त्यामध्ये एन्सेफलायटीसचा धोका निर्माण होतो. हा रोग प्राण्यांपासून माणसांमध्ये पसरतो. निपाह व्हायरस वटवाघुळ आणि डुकरांपासून मानवांमध्ये पसरू शकतो. संक्रमिक झालेल्या व्यक्तीच्या संपर्कात आल्यास या आजाराचे बळी पडू शकतात.
1. निपाह व्हायरस कसा पसरतो?
सिंगापूर आणि मलेशियासारख्या देशांमध्ये अनेक लोक डुकरांच्या किंवा त्यांच्या दूषित ऊतकांच्या थेट संपर्कात निपाह (Nipah) व्हायरसचे बळी ठरले आहेत. याशिवाय खजुराचा कच्चा रस जो वटवाघळांच्या लघवी आणि लाळेने हा रोग (Disease) होतो. तो निपाह व्हायरसच्या संसर्गास कारणीभूत असल्याचे मानले जाते.
2. निपाह व्हायरसची लक्षणे
निपाह विषाणू नसलेल्या संसर्गापासून तीव्र श्वसन संक्रमण आणि घातक एन्सेफलायटीसपर्यंत असू शकतो. यामध्ये रुग्णाला ताप, डोकेदुखी, धाप लागणे, स्नायू दुखणे, उलट्या होणे, घसा खवखवणे अशी लक्षणे (Symptoms) दिसू लागतात. याशिवाय रुग्णाला चक्कर येणे, मूड बदलणे आणि न्यूरोलॉजिकल समस्यांना सामोरे जावे लागू शकते.
डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.