Men's Ethnic Wear: पुरुषांच्या पारंपारिक पोषाखांची मागणी दिवसेंदिवस वाढतेय; शेरवाणीला मिळतेय लोकांची पसंती

Men's Ethnic Wear Demand Increasing: सध्या लग्नाच्या सीझनला सुरुवात झाली आहे. अनेकांच्या घरात लगीनसराई पाहायला मिळत आहे. या सीझनमध्ये पारंपारिक कपड्यांची मागणी दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. मागील काही वर्षात पुरुषांच्या पारंपारिक पोषाख खरेदीत वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे.
Men's Ethnic Wear
Men's Ethnic WearSaam Tv

सध्या लग्नाच्या सीझनला सुरुवात झाली आहे. अनेकांच्या घरात लगीनसराई पाहायला मिळत आहे. या सीझनमध्ये पारंपारिक कपड्यांची मागणी दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. मागील काही वर्षात पुरुषांच्या पारंपारिक पोषाख खरेदीत वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. गेल्या तीन वर्षात शेरवानी, पारंपारिक ड्रेसचे सेल २५ टक्क्यांपेक्षा जास्त वाढले आहे.

लग्नाच्या सीझनमुळे पारंपारिक कपड्यांची मागणी वाढत आहे. त्यामुळे कपड्यांमध्ये वेगवेगळे ब्रँड लाँच होताना दिसत आहे. आदित्य बिर्ला फॅशन, वेदांत फॅशन आणि रेमंड यांसारख्या मोठ्या ब्रँडचे सेल वाढताना दिसत आहे. मागील काही वर्षात शेरवानीची मागणी वाढताना दिसत आहे. शेरवानीच्या वाढत्या मागणीमुळे नफा मोठ्या प्रमाणात होत आहे.

मागील वर्षभरात 'तस्वा' या पुरुषांच्या फॅशन ब्रँडचा विक्री जवळपास दुप्पट झाली आहे. तसेच अंगरखा यांसारखे ब्रँडला ग्राहक चांगलीच पसंती देताना दिसत आहे. नवीन डिझाइन, पोषाखातील नवीन सेगमेंट तसेच कस्टमायझेशन यांमुळे ग्राहक अनेक ब्रँडकडे आकर्षित होतात.

मागील १० वर्षात पुरुषांच्या पोषाखाला चांगलीच पसंती मिळत आहे. २०१५ रोजी पुरुषांच्या कपड्यांचे मार्केट १,१५,८०० कोटी रुपये होते. हेच मार्केट आता वाढले असून २,२३,२०० कोटी रुपयांवर आले आहे. महत्त्वाचे म्हणजे या ब्रँडना सर्वाधिक नफा त्यांच्या ऑफलाइन स्टोरमधून मिळत असल्याचे सांगण्यात येत आहे.

Men's Ethnic Wear
High Blood Sugar : घाबरु नका! शरीरात सतत रक्तातील साखर वाढतेय? हे ४ उपाय लगेच करा

ग्राहकांना भारतीय पोषाखाबद्दल आवड निर्माण झाली आहे. त्यांना महत्त्वपूर्ण डिझाइन आपल्या पोषाखावर असाव्यात असे वाटते. म्हणजेच एखाद्याला आपल्या शेरवानीवर लग्नाची तारीख लिहायची असते. त्यामुळे या पोषाखांची मागणी वाढत आहे. त्याचसोबत लक्झरी म्हणूनदेखील या पोषाखाकडे पाहिजे जाते.

ब्रँड आपले पोषाख उत्तम क्वालिटी आणि चांगले डिझाइन यांमुळे ग्राहकांपर्यंत पोहचणे सोपे होते. ऑफलाइन स्टोअर हा लोकांपर्यंत पोहचण्यासाठी सर्वात महत्त्वाचा मार्ग आहे. जवळपास ९० टक्के लोक हे ऑफलाइन स्टोअरमधून खरेदी करतात.

Men's Ethnic Wear
Upcoming Smartphone in May 2024 : दमदार फीचर्स अन् जबरदस्त कॅमेरासह मे महिन्यात लॉन्च होणार Vivo, Apple सारखे स्मार्टफोन, लिस्ट पाहा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com