
मतदार यादीतून नाव वगळल्यास त्वरित तक्रार करणे आवश्यक आहे.
ऑनलाईन फॉर्म 6 भरून नाव परत समाविष्ट करता येते.
चुकीच्या माहितीच्या दुरुस्तीसाठी फॉर्म 8 उपलब्ध आहे.
निवडणूक आयोगाकडे जिल्हा किंवा ऑनलाईन पातळीवर तक्रार करता येते.
मतांची चोरी होत असल्याचा आरोप काँग्रेस खासदार आणि विरोधी पक्षनेते राहल गांधींनी यांनी केला. निवडणूक आयोग मत चोरी करण्यात मदत करत असल्याचं म्हणत आयोग आणि भाजपवर जोरदार टीका केली. राहुल गांधींच्या आरोपानंतर मतदार यादीमधील गोंधळ समोर येत आहे. कुठे यादीत कोणचाचे नाव नाही तर कुठे मृत व्यक्तीचे नाव अजून आहे.
तर कुठे मृत व्यक्तीचे नाव अजूनही दिसत आहे. काही ठिकाणी तर एकाच पत्त्यावर अनेक एकापेक्षा जास्त मतदारांची नावे आहेत. जर तुमचेही नाव मतदार यादीतून गायब झाले असेल तर त्वरीत तक्रार करत तुमचे नाव यादीत समाविष्ट करून घ्या.
मतदान कार्ड हे प्रत्येक नागरिकासाठी महत्त्वाचं कागदपत्र आहे. ते एक ओळखपत्र आहे, हे कार्ड ज्या व्यक्तीकडे आहे त्याला मतदान टाकण्याचा अधिकार प्राप्त होतो. दरम्यान तुमच्याकडे मतदार कार्ड नसले तरीही, तुमचे नाव मतदार यादीत असल्यास तुम्ही मतदान करू शकता.
मतदान करण्यासाठी तुमचे नाव मतदार यादीत असणे आवश्यक आहे. कारण त्यानंतरच तुम्ही मतदान करू शकाल. जर काही कारणास्तव तुमचे नाव मतदार यादीतून वगळले गेले असेल तर घाबरून जाण्याची गरज नाही. हे सहजपणे दुरुस्त करता येते. येथे आम्ही तुम्हाला या परिस्थितीत काय करावे, अर्ज कसा करावा, प्रक्रिया काय आहे , कुठे तक्रार करावी लागेल हे जाणून घेऊ.
मतदार यादीतून नाव वगळण्यात आले असेल तर ऑनलाइन तक्रार दाखल करा.
सर्वप्रथम तुम्हाला राष्ट्रीय मतदार सेवा पोर्टल (NVSP) च्या अधिकृत वेबसाइट https://voters.eci.gov.in/ ला भेट द्यावी लागेल.
यानंतर तुम्हाला 'रजिस्टर तक्रार' Register Complaint किंवा 'शेअर सजेशन' Share Suggestion या विभागावर क्लिक करावे लागेल.
त्यानंतर 'तक्रार नोंदवा' वर क्लिक करा.
या स्टेप्सनंतर तुम्हाला तेथे तुमचे खाते तयार करावे लागेल.
आता शेवटच्या टप्प्यात तुम्ही तुमची तक्रार नोंदवू शकता.
तसेच निवडणूक आयोगाच्या वेबसाइटवर मदत उपलब्ध असेल. प्रक्रियेत तुम्हाला काही अडचण आल्यास, तुम्ही आयोगाकडे तुमची तक्रार नोंदवू शकता आणि तुमच्या तक्रारीवर त्वरित कारवाई केली जाईल.
तुम्ही निवडणूक आयोगाच्या हेल्पलाइन क्रमांक १९५० वर संपर्क साधू शकता किंवा तुमच्या क्षेत्रातील ब्लॉक लेव्हल ऑफिसर (BLO) ची मदत घेऊ शकता. याह कोणत्याही विसंगतीच्या तक्रारी निवडणूक आयोगाच्या वेबसाइटवर नोंदवता येतील.
तुमची तक्रार नोंदवण्यासाठी, तुम्ही तुमच्या क्षेत्रातील बूथ लेव्हल ऑफिसर (बीएलओ) ला देखील भेटू शकता. तक्रार नोंदवण्यासाठी, तुम्हाला फॉर्म ६ भरून पासपोर्ट आकाराचा फोटो आणि काही महत्त्वाची कागदपत्रे सादर करावी लागतील. त्यानंतर तुमचे नाव पुन्हा मतदार यादीत समाविष्ट केले जाईल. नाव जोडल्यानंतर, तुम्ही तुमचे मतदान करू शकाल.
बऱ्याचदा लोक त्यांचे घर बदलतात. जर तुम्ही त्याच शहरात राहताना तुमचा परिसर बदलला असेल, तर सर्वप्रथम तुम्हाला जुन्या भागातील मतदार यादीतून तुमचे नाव काढून टाकावे लागेल. त्यानंतर तुम्हाला फॉर्म ७ भरावा लागेल, जो तुम्ही निवडणूक आयोगाच्या वेबसाइटवरून ऑनलाइन डाउनलोड करू शकाल. यानंतर तुमचा फॉर्म तुमच्या ओळखीच्या पुराव्यासह आणि पत्त्याच्या पुराव्यासह जोडा आणि तो बीएलओकडे सबमिट करा. हे केल्यानंतर, तुमचे नाव तुम्ही ज्या नवीन भागात राहायला सुरुवात केली आहे त्या मतदार यादीत समाविष्ट केले जाईल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.