Voter ID: मतदार ओळखपत्र बनविण्यासाठी लांबलचक रांगेत उभं राहण्याचं झंझट मिटलं; घरबसल्या करा अर्ज

Voter ID Card: मतदार ओळखपत्र बनविण्यासाठी आता लांबलचक रांगेत उभं राहण्याची गरज नाही. त्यासाठी तुम्ही घरबसल्या अर्ज करू शकता. याविषयीची सविस्तर माहिती आपण जाणून घेऊ या.
Voter ID
Voter ID Yandex
Published On

Voter Helpline App

भारतातील निवडणुकीत मतदान करण्यासाठी मतदार ओळखपत्र (Voter ID Card) हे आवश्यक कागदपत्र आहे. पण ते बनविण्यासाठी आपल्याला खूप वेळखाऊ प्रक्रियेला सामोरं जावं लागतं. हे टेन्शन आता मिटलं आहे. आता आपण आपल्या घरी बसून मतदार ओळखपत्र बनविण्यासाठी ऑनलाईन अर्ज करू शकतो. त्यासाठी कोणती प्रक्रिया असते, ते आपण जाणून घेऊ या.  (Maharashtra News)

लोकसभा निवडणुका येत आहेत, देशभरात खासदारांसाठी मतदान होणार आहे. तुमचं मतदार ओळखपत्र हरवलं किंवा खराब झालं असेल, किंवा तुम्हाला नवीन मतदार ओळखपत्र बनवायचं असेल. तर तुम्ही फॉर्म 8 भरून मतदार ओळखपत्रासाठी अर्ज करू (Voter ID Application) शकता. निवडणूक आयोगाने मतदानासाठी मतदार कार्डासह इतर अनेक ओळखपत्रे अनिवार्य केली आहेत. त्याशिवाय तुम्ही लोकसभा निवडणुकीत मतदान करू शकत नाही.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मतदार हेल्पलाइन ॲप

तुमच्याकडे मतदार कार्ड नसेल किंवा तुम्हाला मतदार कार्डमध्ये काही दुरुस्त्या करायच्या असतील, तर सरकारी कार्यालयात जाण्याची गरज नाही. मतदार कार्ड बनवण्याचा ऑनलाइन मार्ग आहे. यामध्ये तुम्हाला Google Play Store वरून एक ॲप डाउनलोड करावे लागेल. त्यावर तुमचे सर्व तपशील भरावे लागतील. काही दिवसांनी मतदार कार्ड तुमच्या घरच्या पत्त्यावर पोहोचवले जाईल.

मतदार ओळखपत्र ऑनलाइन करण्यासाठी, तुम्हाला Android आणि iOS मोबाइलमधील Google Play Store आणि Play Store वरून भारतीय निवडणूक आयोगाचे मतदार हेल्पलाइन ॲप डाउनलोड करावे लागेल. या ॲपच्या मदतीने तुम्ही मतदार कार्ड आणि मतदार कार्डमध्ये ऑनलाइन दुरुस्ती करू शकता.

Voter ID
Voter ID Online | Voter ID ऑनलाइन कसा काढायचा? #voterid #voting

नवीन मतदार कार्डासाठी अर्ज

सर्वप्रथम तुमच्या मोबाईलमध्ये व्होटर हेल्पलाइन ॲप इन्स्टॉल करा. यानंतर मतदार नोंदणीवर क्लिक करा. त्यानंतर ॲपमध्ये तुमचे नाव, पत्ता, मोबाइल नंबर आणि आधार कार्ड तपशील यासारखी आवश्यक माहिती (Voter Helpline App) भरा. या सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, वरच्या बटणावर क्लिक करा. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, बीएलओकडून पडताळणी केली जाईल. तुमचे नवीन मतदार कार्ड तयार होईल आणि तुमच्या घरी येईल.

जुन्या मतदार कार्डमध्ये दुरुस्ती

तुम्ही मतदार हेल्पलाइन ॲपद्वारे तुमच्या जुन्या मतदार ओळखपत्रात दुरुस्त्या देखील करू शकता. यासाठी तुम्हाला ॲपच्या शेवटी तक्रार आणि नोंदणी पर्यायावर क्लिक करावं लागेल. त्यानंतर काही महत्त्वाचे तपशील भरावे लागतील. काही दिवसांनी तुमचे नवीन मतदार ओळखपत्र तयार होऊन तुमच्या घरी पोहोचेल.

Voter ID
New Voter ID: मतदान ओळखपत्र हरवलं आहे? सोप्या पद्धतीने बनवा ड्युप्लिकेट कार्ड

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com