New Voter ID: मतदान ओळखपत्र हरवलं आहे? सोप्या पद्धतीने बनवा ड्युप्लिकेट कार्ड

Voter ID: भारतात १८ वर्षांवरील प्रत्येक नागरिकाला मतदान करण्याचा अधिकार आहे. मतदान करण्यासाठी मतदार ओळखपत्र म्हणजेच वोटर आयडी महत्त्वाचे असते. जर तुमचे वोटर आयडी हरवले आहे तर या सोप्या मार्गाने ड्युप्लिकेट कार्ड बनवू शकता.
Voter ID
Voter IDYandex
Published On

How To Make Duplicate Voter ID Process:

भारतातील प्रत्येक नागरिकाला मतदानाचा अधिकार आहे. १८ वर्षांवरील प्रत्येकजण मतदान करु शकते. मतदान करण्यासाठी मतदार ओळखपत्र म्हणजेच वोटर आयडी असणे खूप महत्त्वाचे आहे. वोटर आयडी ही मतदाराची ओळख असते. वोटर आयडी हे खूप जपून ठेवायचे असते. वोटर आयडी हरवल्यास खूप प्रॉब्लेम्स येतात. जर तुमचेही वोटर आयडी हरवले आहे तर या मार्गाने तुम्ही डुप्लिकेट वोटर आयडी बनवू शकतात. (Latest News)

ड्युप्लिकेट वोटर आयडी

वोटर आयडी हरवल्यास तुम्ही ड्युप्लिकेट वोटर आयडी तयार करु शकतात. भारतीय निवडणूक आयोगाने सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात ड्युप्लिकेट वोटर आयडीसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु केली आहे.

ड्युप्लिकेट वोटर आयडी बनवण्यासाठी राज्याच्या निवडणूक आयोगाच्या EPIC-002 फॉर्म डाउनलोड करावा लागतो. त्यानंतर फॉर्म भरुन त्याच्यासोबत काही कागदपत्रे जोडावी लागतात. तसेच ड्युप्लिकेट वोटर आयडी का बनवायचे आहे याचे कारणदेखील द्यावे लागेल. जर तुमचे वोटर आयडी चोरीला गेले असेल तर फॉर्मसोबत तुम्हाला एफआयआरची प्रत जोडावी लागेल. त्यानंतर हा फॉर्म स्थानिक निवडणूक आयोगाकडे जमा करावा लागेल. त्यानंतर तुम्हाला एक नंबर दिला जाईल. हा नंबर वापरुन तुम्ही राज्या निवडणूक आयोगाच्या वेबसाइटवर जाइन टाका. त्यानंतर तुम्ही तुमचा अर्ज तपासू शकता. त्यानंतर तुमच्या अर्जाची तपासणी केली जाईल. काही दिवसांनी तुम्ही तुमचा वोटर आयडी स्थानिक निवडणूक आयोगाकडून मिळवू शकता.

Voter ID
Jawa 350 Review : नवीन अवतारात आली जावा 350 क्रूझर बाईक, परफॉर्मन्सपासून ते फीचर्सपर्यंत सर्व काही जाणून घ्या

ऑफलाइन अर्जदेखील करु शकता

ड्युप्लिकेट वोटर आयडी बनवण्यासाठी तुम्ही निवडणूक कार्यालयात जाऊन ऑफलाइन अर्ज करु शकता. त्यानंतर तुम्हाला एक फॉर्म भरावा लागेल. नाव, पत्ता, जुना वोटर नंबर टाकावा लागेल. त्यानंतर फॉर्ममध्ये लिहलेली सर्व कागदपत्रे सादर करावी लागेल. त्यानंतर माहिती तपासल्यानंतर नवीन वोटर आयडी देण्यात येईल.

Voter ID
Petrol Diesel Price Today: मुंबई, पुण्यासह राज्यात पेट्रोल-डिझेल स्वस्त की महाग? वाचा नवीन दर

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com