Nandurbar News : नंदुरबार जिल्ह्यात १ लाख ८ हजार नवमतदार; लोकसभा निवडणुकीत १३ लाख मतदार बजावणार हक्क

Nandurbar News : नंदुरबार लोकसभा मतदार संघात धुळे जिल्ह्यातील दोन तालुके आणि नंदुरबार जिल्ह्यातील चार तालुके असे एकूण सहा विधानसभा मतदार संघाच्या समावेश आहे.
Nandurbar Loksabha
Nandurbar Loksabha Saam tv
Published On

सागर निकवाडे 

नंदुरबार : राज्यभरात लोकसभा निवडणुकीचे वारे वहायला सुरुवात झाली आहे. त्या अनुषंगाने नवमतदार नोंदणी देखील सुरु करण्यात आली आहे. त्यानुसार (Nandurbar) नंदुरबार जिल्ह्यात १ लाख ८ हजार नवमतदार जुडले असून जिल्ह्यातील १३ लाख मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. (Tajya Batmya)

Nandurbar Loksabha
Kalyan Railway Station : लोकलची वाट बघणाऱ्या महिला प्रवासीची छेड; आरोपीला रेल्वे पोलिसांनी घेतले ताब्यात

नंदुरबार लोकसभा मतदार संघात धुळे (Dhule) जिल्ह्यातील दोन तालुके आणि नंदुरबार जिल्ह्यातील चार तालुके असे एकूण सहा विधानसभा मतदार संघाच्या समावेश आहे. नंदुरबार जिल्ह्यातील चार विधानसभा मतदार संघांमध्ये १ लाख ८ हजार नवीन मतदारांचे समावेश झाले आहे. यामुळे येत्या लोकसभेला १ लाख मतदाते पहिल्यांदाच (Loksabha Electrion) मतदान करू शकतील. नंदुरबार जिल्ह्यातील ४ विधानसभा मतदारसंघात २०२१ ते २०२३ या काळात ३७ हजार मतदारांच्या नव्याने समावेश झाला होता. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Nandurbar Loksabha
Satara News : लिंगमळा परिसरात गव्यांचा धुडगूस; स्ट्रॉबेरी पिकाचे मोठे नुकसान

सद्यस्थितीत जिल्ह्यात १२ लाख ७२ हजार ५९३ मतदार आहेत. यात नव्याने ७३ हजार नवमतदारांच्या समावेश करण्याचे कामकाज सुरू आहे. मतदारांनी जमा केलेले अर्ज सहा सात आणि आठ यांना अंतिम रूप दिल्यानंतर मतदार याद्यांमध्ये या मतदारांच्या समावेश होणार आहे. नंदुरबार जिल्हा प्रशासन आणि निवडणूक विभागाकडून मतदान नोंदणीसाठी वेळोवेळी अभियान राबवले जात असते. यामुळे गेल्या तीन वर्षात आतापर्यंत १ लाख ८ हजार मतदारांची वाढ या लोकसभा निवडणूकित होणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com