Safety First : नववर्षाच्या सुट्ट्यांचा आनंद लुटताना काळजी घ्या 'या' गोष्टींची; वाचा सविस्तर

Vacation Safety : सध्या लोक अनेक ठिकाणी फिरण्याचे प्लान करत आहेत. त्यात ख्रिसमस, न्यू इयर असे सण सुद्धा समोर आले आहेत.त्यावेळेस आपले प्रवास जास्त होत असतात.
Family Travel Tips
moneyyandex
Published On

सध्या लोक अनेक ठिकाणी फिरण्याचे प्लान करत आहेत. त्यात ख्रिसमस, न्यू इयर असे सण सुद्धा समोर येवून ठेपले आहेत. या पार्श्वभुमीवर ह्विसाचा २०२४ हॉलिडे थेट्सचा रिपोर्ट समोर आला आहे. त्यात ई-कॉमर्स व वैयक्तिक खरेदीचे प्रमाण वाढत असल्यामुळे पैसे चोरण्यासाठी विविध पद्धतीचा वापर केला जातोय असे अनेक घोटाळे समोर येत आहेत. खरेदीदारांचे अशा धोक्यांपासून संरक्षण करण्यासाठी व्हिसा आवश्यक आहे. त्याच्या काही टिप्स वापरून तुम्ही होणाऱ्या पैशांच्या घोटाळ्यांपासून वाचू शकता.

१. बनावट हॉलिडे ई-कार्डचे घोटाळे

तुम्ही बनावट हॉलिडे ई- कार्ड आणि फिशिंग घोटाळ्यांवर लक्ष ठेवणे महत्वाचे आहे. सायबर गुन्हेगार मालवेअर इन्स्टॉल करण्यासाठी अनेकदा खोटे ईमेल्स किंवा हॉलिडे-थीम ईकार्डचा वापर करतात. त्यावर हयात नसलेल्या लिंक्सवर क्लिक करणे टाळा आणि प्रत्यक्ष रिटेलर्सच्या वेबसाइटवर ऑफर्सचे खरे खोटे करा.

Family Travel Tips
Tiffin Box Recipes : तुमची मुलं भाज्या खात नाहीत? मग मुलांना टिफीनमध्ये द्या 'या' स्टाईलची क्रिस्पी भेंडी

२. तुम्हाला माहित असलेल्याच लिंकवर जा

तुम्ही ऑनलाइन शॉपिंग करताना विश्वसनीय वेबसाईट्सचाच वापर करा. 'https' या अक्षरांपासून सुरू होणाऱ्या लिंकवर जा. त्याची अनेक ठिकाणी माहिती घ्या. ज्यामधून सुरक्षित कनेक्शनचा संकेत तुम्हाला मिळू शकतो. या सोप्या तपासणीमुळे व्यवहारांदरम्यान संवेदनशील माहितीचे संरक्षण होण्यास मदत होईल.

३. अधिक सुरक्षिततेसाठी क्रेडिट कार्डचा वापर करा

तुम्ही बऱ्याच वेळा क्यू आर कोडचा वापर करत असाल. पण कार्ड पेमेंट्स टू-फॅक्टर ऑथेन्टिकेशन, टोकनायझेशन आणि एसएसएल हँडशेक तंत्रज्ञान अशा वैशिष्ट्यांच्या माध्यमातून फसवणुकीपासून प्रबळ संरक्षण देतात. ही वैशिष्टे वैयक्तिक डिवाईस आणि रिटेलर साइट्सदरम्यान तुमचा डेटा एक्सचेंज झाला की नाही याची खात्री देतात.

४. नियमितपणे व्यवहारांवर द

सुट्टीच्या दिवसात धावपळीदरम्यान किंवा प्रवासादरम्यान खरेदींवर ठेवणे अवघड ठरू शकते. कोणत्याही अनधिकृत व्यवहारांना ओळखण्यासाठी पेमेंट नोटीफिकेशन्स सेट अप करणं महत्वाचं आहे. त्यात वारंवार कार्ड किंवा पेमेंट स्टेटमेंट्सचे पुनरावलोकन करा. अशा काही तक्रारी आढळल्यास त्वरित तक्रार करा.

वैयक्तिक व आर्थिक तपशील सेव्ह व शेअर करण्याबाबत साबत तुम्ही नेहमी सावधगिरी बाळगा. तसेच सार्वजनिक वायफायचा वापर करून शॉपिंग करणे टाळा. कारण त्यावर सायबर गुन्हेगारांना डेटा इंटरसेप्ट करणे सोपे जाते. या सोप्या टिप्सचा वापर करून तुम्ही होणाऱ्या पैशांच्या घोटाळ्यापासून वाचू शकता.

Written By : Sakshi Jadhav

Family Travel Tips
Winter Skin Care : किचनमधला 'हा' एक पदार्थ वापरा; हिवाळ्यातही मिळेल ग्लोइंग स्कीन

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com