Paytm News: Paytm चहुबाजूंनी अडचणीत, आता पेमेंट्स बँकेविरुद्ध FEMA अंतर्गत खटला? ED नेही तपास केला सुरू

Paytm News Update: पेटीएमवर आलेले संकट संपण्याची चिन्हे दिसत नाही आहेत. आता पेटीएम पेमेंट्स बँकेविरुद्ध फॉरेन एक्स्चेंज मॅनेजमेंट ॲक्ट (फेमा) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Paytm News
Paytm NewsSaam Digital
Published On

Paytm News

पेटीएमवर आलेले संकट संपण्याची चिन्हे दिसत नाही आहेत. आता पेटीएम पेमेंट्स बँकेविरुद्ध फॉरेन एक्स्चेंज मॅनेजमेंट ॲक्ट (फेमा) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याआधी, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने Paytm च्या बँकिंग युनिट पेटीएम पेमेंट्स बँकेतील संशयास्पद व्यवहारांची चौकशी करण्याच्या सूचना अंमलबजावणी संचालनालयाला दिल्या होत्या. दरम्यान ईडीने कंपनीच्या कामकाजाची प्राथमिक चौकशी सुरू केली आहे.

रॉयटर्सने दिलेल्या माहितीनुसार, फिनटेक कंपनीची फॉरेन एक्स्चेंज मॅनेजमेंट ॲक्ट (FEMA) च्या विशेष तरतुदींनुसार चौकशी केली जात आहे. ज्यात वैयक्तिक आणि कॉर्पोरेट्सद्वारा परदेशात केलेल्या हस्तांतरणाचा समावेश आहे. मात्र या संपूर्ण प्रकरणी अद्याप कोणतेही अधिकृत विधान समोर आलेलं नाही. सध्या फक्त ईडी आणि आरबीआय या प्रकरणाची चौकशी करत आहेत. इतर यंत्रणांकडून अतिरिक्त मदत हवी असल्यास ती नक्कीच घेतली जाईल. या संपूर्ण प्रक्रियेत सरकारी हस्तक्षेप होणार नाही.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Paytm News
हिरोची जबरदस्त Hero Mavrick 440 लाँच; ग्राहकांसाठी कंपनीची स्पेशल ऑफर; जाणून घ्या

29 फेब्रुवारीपासून सेवांवर बंदी घालण्यात येणार आहे

पेटीएमने सांगितले की कंपनी अधिकाऱ्यांना सहकार्य करत आहे. One97 Communications Limited आणि तिचे सहयोगी पेटीएम पेमेंट्स बँकेबद्दल माहिती देण्यात कोणतीही कसर सोडणार नाहीत. पेटीएमने म्हटले आहे की आम्हाला ईडीसह अनेक नियामक आणि कायदेशीर अंमलबजावणी प्राधिकरणांद्वारे माहिती आणि स्पष्टीकरण देण्यास सांगितले जाऊ शकते. दरम्यान RBI ने पेटीएम पेमेंट बँकेवर बंदी घातली आहे. हा आदेश २९ फेब्रुवारीपासून लागू होणार आहे. पेटीएम पेमेंट बँकेच्या अंतर्गत वॉलेट आणि यूपीआय देखील आहे.

ग्राहकांची गैरसोय होऊ नये म्हणून मध्यवर्ती बँकेने पेटीएम पेमेंट्स बँकेला एक महिन्याची मुदत देण्यात आल्याचं आरबीआयने म्हटलं आहे. दरम्यान बुधवारी (१४ फेब्रुवारी) सुरुवातीच्या ट्रेडिंग तासांमध्ये पेटीएमचा शेअर पुन्हा एकदा जवळपास १०% घसरून बीएसईवर ३४२.४ रुपयांच्या नवीन विक्रमी नीचांकी पातळीवर पोहोचला.

Paytm News
Sukanya Samiuddhi Yojana: मुलीचं भविष्य करा सुरक्षित; वर्षाला १.५० लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ७० लाख

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com