Malaysia Visa-Free Entry : मलेशियात भारतीयांसाठी खास ऑफर! व्हिसा फ्री करता येणार प्रवास, कशी असेल सुविधा; वाचा एका क्लिकवर

Free Visa Entry In Malaysia : आर्थिक प्रगतीसाठी मलेशिया आता श्रीलंका आणि थायलंडच्या मार्गावर आहे. मलेशियाने भारतीय नागरिकांना 30 दिवसांसाठी मोफत व्हिसा देण्याचेही म्हटले आहे. ती 1 डिसेंबरपासून लागू होणार आहे.
Malaysia Visa-Free Entry
Malaysia Visa-Free Entry Saam Tv
Published On

Malaysia Tourist :

तुम्हीही मलेशियाला जाण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. आता भारतीयांसाठी मलेशियाला जाणे आणखी सोपे झाले आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मलेशियाच्या पंतप्रधान अन्वर इब्राहिम यांनी रविवारी घोषणा केली की, मलेशिया 1 डिसेंबरपासून चीन (China) आणि भारताच्या नागरिकांना 30 दिवसांच्या मुक्कामासाठी व्हिसा-फ्री प्रवेश देईल. ही घोषणा त्यांनी पीपल्स जस्टिस पार्टीच्या काँग्रेसमधील भाषणादरम्यान केली. मात्र, व्हिसा-फ्री प्रवेश किती काळासाठी लागू असेल हे त्यांनी अजून तरी सांगितले नाही.

थायलंड-श्रीलंका मध्ये आधीच व्हिसा फ्री प्रवेश

भारतीयांना थायलंड आणि श्रीलंकेत आधीच व्हिसा फ्री (Visa Free) एंट्री मिळली आहे. तसेच असे आता मलेशियाही करणारा हा तिसरा आशियाई देश बनला आहे. यापूर्वी मलेशियाने कुवेत, सौदी अरेबिया, बहरीन, यूएई, तुर्की, जॉर्डन आणि इराण या देशांना ही सूट दिली होती.

Malaysia Visa-Free Entry
Winter Travel Place: मौसम मस्ताना रस्ता अंजना, गुलाबी थंडी अन् हिमालयातील प्रसिद्ध स्थळे

पीएम मोदींसोबतच्या संबंधांतून बळ मिळाले

भारताच्या बाजूने ही घोषणा ASEAN मध्ये इंडियन मीडिया एक्सचेंज प्रोग्राम 2023 अंतर्गत करण्यात आली. या कार्यक्रमात मलेशियाचे उच्च आयुक्त बीएन रेड्डी म्हणाले की, मलेशियाचे भारतासोबतचे संबंध अतिशय खास आहेत. गेल्या वर्षी भारत आणि मलेशिया यांच्या राजनैतिक संबंधांना 65 वर्षे पूर्ण झाली 2015 मध्ये पंतप्रधान मोदींच्या भेटीनंतर दोन्ही देशांमधील संबंध अधिक दृढ झाले आहे.

Malaysia Visa-Free Entry
Travel Loan : फॉरेनला जाण्याचे स्वप्न होईल पूर्ण, बजेट नसतानाही परदेशी वारी करता येणार; काय आहे ट्रॅव्हल लोन? वाचा सविस्तर

चीन आणि भारतातून लोक मोठ्या संख्येने मलेशियाला जातात

मलेशियाला जाणाऱ्या पर्यटकांमध्ये चिनी लोक चौथ्या क्रमांकावर आहेत आणि भारत पाचव्या स्थानावर आहे. मलेशियासाठी दोन्ही देश मोठी बाजारपेठ ठरतात. सरकारी आकडेवारीनुसार, मलेशियामध्ये या वर्षी जानेवारी ते जून दरम्यान 9.16 दशलक्ष पर्यटक आले, त्यात चीनमधील 4 लाख 98 हजार 540 पर्यटक आणि भारतातील 2 लाख 83 हजार 885 पर्यटकांचा समावेश होता.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com