How To Apply For B2 Visa
How To Apply For B2 VisaSaam Tv

How To Apply For B2 Visa : उन्हाळ्याच्या सुट्टीत परदेशात फिरायला जायचे आहे? अशा प्रकारे मिळवा US B-2 व्हिसा

B2 Visa For Summer Holidays : ज्या भारतीय लोकांना प्रेक्षणीय स्थळे, सुट्टीसाठी किंवा व्यवसाय दौर्‍यासाठी अमेरिकेत जायचे आहे.
Published on

B2 Visa For Summer Tourists : ज्या भारतीय लोकांना प्रेक्षणीय स्थळे, सुट्टीसाठी किंवा व्यवसाय दौर्‍यासाठी अमेरिकेत जायचे आहे, त्यांना त्यांच्या प्रवासापूर्वी 'नॉन इमिग्रंट व्हिसा' (यूएस व्हिसा) साठी अर्ज करावा लागेल. 'नॉन-इमिग्रंट' अशा व्यक्तीला लागू होतो जो यूएसला तात्पुरता भेट देत आहे आणि तेथे कायमचा वास्तव्य करण्याचा कोणताही हेतू नाही.

यूएस व्हिसा हा पर्यटक, नातेवाईक, व्यावसायिक, परफॉर्मिंग कलाकार, धार्मिक कामगार आणि असाधारण क्षमता असलेल्या व्यक्तींना जारी केलेला एक बिगर स्थलांतरित व्हिसा आहे (याला B-2 व्हिसा देखील म्हणतात). व्हिसा अर्ज प्रक्रियेसाठी कॉन्सुलर अधिकाऱ्यांची वैयक्तिक मुलाखत (Interview) आवश्यक आहे.

How To Apply For B2 Visa
March Travel Plan : मार्च महिन्यात ट्रीप प्लॅन करत आहात, तर हे जबरदस्त ठिकाण तुमच्या विशलिस्टमध्ये ऍड करा

बी-२ व्हिसा मिळवण्याची प्रक्रिया -

अमेरिकेत फिरायला येण्यासाठी काय करावे,व्हिसा कसा करावा, कोणते कागदपत्र लागतात, अर्ज कसा करावा किंवा एकंदरीत सर्व प्रक्रिया काय आहे,🇺🇸च्या व्हिसाचे अनेक प्रकार आहेत आणि त्या प्रकारानुसार लागणारी कागदपत्रे प्रक्रिया बदलत जातात.

बी-२ व्हिसा पर्यटनासाठी, मित्र-नातेवाईकांना भेटण्यासाठी किंवा कार्यक्रमांना उपस्थित राहण्यासाठी वापरला जातो. बी-१ व्हिसा हा कंपनीच्या कामासाठी जाणाऱ्या लोकांसाठी (People) असतो.सध्या लागणारा वेळ आणि मिळणारी तारीख खूप लांबची असल्यामुळे ह्या प्रक्रियेला सुरुवात खूप आधीच केली पाहिजे.

डीएस-१६० भरणे -

ह्या अर्जात तुमची बरीच माहिती विचारली जाते,भारतातील कोणत्याही दूतावासाला(मुंबई,दिल्ली,कलकत्ता,हैदराबाद,चेन्नई) अर्ज करू शकता. पहिल्यांदा अर्ज करत असल्यास स्वतः मुलाखतीसाठी जावे लागते त्यामुळे जवळच्या ठिकाणी जावे -

https://ceac.state.gov/GenNIV/Default.aspx

How To Apply For B2 Visa
Train Traveling : प्रवासासाठी महिलेने पकडली ट्रेन; अचानक बाळासह घेतली उडी, पुढे काय झालं?

डीएस-१६० प्रस्तूत करणे -

अर्ज पूर्ण भरून झाला की दिलेली माहिती तपासून पहा,ही माहिती बरोबरच असली पाहिजे,तपासून झाल्यावर हा अर्ज प्रस्तूत करावा,एकदा भरायला घेतला की तो सेव करत राहावा नाहीतर परत उघडावा लागतो,३० दिवसातच भरला पाहिजे नाहीतर त्याची वैधता संपते.अर्जाचा नंबर लिहावा

USTravelDocs प्रोफाइल -

डीएस-१६० मध्ये दिलेला ई-मेल वापरून ह्यावर स्वतःचे खाते उघडा, लिंकवर पूर्ण प्रक्रिया दिली आहे,इथे प्रोफाइल बनवताना माहिती आणि डीएस-१६० चा नंबर द्यावा लागतो,सर्व माहिती भरल्यावर अर्जाचे पैसे भरावे लागतात त्याची पावतीही दिसते

https://ustraveldocs.com/in/en/nonimmigrant-visa

How To Apply For B2 Visa
Travel Tips : प्रवासाला अधिक सुखकर करण्यासाठी या गोष्टी नेहमी सोबत ठेवा

पैसे भरणे -

ह्या व्हिसासाठी $१६० फी आहे,ती भरण्याचे विविध मार्ग आहेत. ऑनलाईन किंवा बँकमध्ये पैसे भरू शकता,त्याची माहिती इथे दिली आहे,पैसे भरल्यानंतर साधारण १२ तासात प्रोफाइलमध्ये पैसे जमा झाल्याची पोच मिळते,ह्या नंतरच पुढे अपॉइंटमेंट घेता येते.

https://ustraveldocs.com/no/no-niv-paymentinfo.asp

अपॉइंटमेंट घेणे -

पैसे भरल्याची पोच जमा झाली की USTravelDocs प्रोफाइल मधून तुम्ही कोणत्याही अमेरिकन दूतावास मध्ये इंटरव्यूची तारीख,वेळ घेऊ शकता,शक्यतो तुमच्यापासून जवळ असणाऱ्या दूतावासाची वेळ घेणे सोपं ठरते,ह्यावर पूर्वी काही बंधने होती पण आता कोणत्याही दूतावासात अर्ज करू शकता

How To Apply For B2 Visa
Free Travel : आता फ्रीमध्ये फिरा Hong kong, असा घ्या सुवर्णसंधीचा लाभ

कागदपत्रे -

- 6 महिने वैध आणि जुने पासपोर्ट

- 2 फोटो(अमेरिका व्हिसासाठी चे)

- इंटरव्यूची पावती

- डीएस-160 ची पावती

- प्रवासाची माहिती

- बॅंकचे कागदपत्र

- टॅक्स चे कागदपत्र(मागील २ वर्षांचे)

- मालमत्तेचे कागदपत्र

- नातेवाईकांचे आमंत्रणपत्र

- पॅन, आधार पत्र

इंटरव्यू -

इंटरव्यू 2-3 मिनिटे चालतो,व्हिसा ऑफिसर ने विचारलेल्या प्रश्नांची खरी उत्तरं द्यावीत,इंग्रजी मध्ये नको असेल तर स्थानिक भाषेत बोलता येते,त्यासाठी दुभाषीची सोय असते,ऑफिसर व्हिसा मान्य/अमान्य सांगतो,मान्य असेल तर 1-2 आठवड्यात पासपोर्ट घरी किंवा ठराविक ठिकाणी येतो

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. याचा आमच्याशी कोणताही संबंध नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com