Vat Purnima 2023 : पहिल्यांदाच वटपौर्णिमेचा उपवास करताय ? या गोष्टी लक्षात ठेवा

Vat Purnima 2023 Date : यंदा वटपौर्णिमा ही ३ जूनला साजरी केली जाणार आहे.
Vat Purnima 2023
Vat Purnima 2023Saam Tv

Jyeshta Purnima Puja Time : ज्येष्ठ पौर्णिमा ही वटपौर्णिमा म्हणून ओळखली जाते. यंदा ही वटपौर्णिमा ही ३ जूनला साजरी केली जाणार आहे. हिंदू धर्मात वटपौर्णिमेला अधिक महत्त्व आहे. सुवासिनी या दिवशी व्रत करतात.

वटपौर्णिमा व्रतामध्ये विवाहित स्त्रिया (Women) उपवासासह वट सावित्री व्रताची कथा ऐकतात आणि त्यानंतर त्या वटवृक्षाची विधीपूर्वक पूजा करतात. यंदा वटपौर्णिमेला 3 शुभ योग तयार होत आहेत.

Vat Purnima 2023
Vat Purnima 2023 : यंदा वटपौर्णिमा कधी आहे ? जाणून घ्या महत्त्व व शुभ मुहूर्त

वडाच्या झाडाला अक्षय म्हणून ओळखले जाते. या दिवशी स्त्रिया पुत्रप्राप्तीसाठी तसेच सुख-शांतीसाठी वटची पूजा करून प्रदक्षिणा करतात. या दिवशी वटवृक्षाला पाण्याने वाहून त्याच्याभोवती सुताने गुंडाळून ७ वेळा प्रदक्षिणा केली जाते. वटवृक्षाच्या मुळाशी ब्रह्मदेव, मध्यभागी विष्णू आणि समोर महादेव वास करतात असे पुराणात लिहिले आहे.

1. वटसावित्रीचे व्रत ठेवताना काही नियम

  • वट सावित्रीच्या दिवशी महिलांनी काळे, निळे आणि पांढरे कपडे (Clothes) घालू नयेत. तसेच, या रंगाच्या बांगड्या घालू नका.

  • वट सावित्रीच्या दिवशी जोडीदाराशी (Partner) वाद घालू नका किंवा भांडण करू नका. एकमेकांशी चांगले वागावे.

  • वट सावित्रीच्या दिवशी कोणाशीही चुकीचे किंवा फसवणुकीचे नियोजन करू नका. कारण मन, वाणी आणि कर्म यांच्या शुद्धीसाठी उपवास केला जातो. मनात कुणाबद्दल वाईट विचार करूनही त्याचे फळ मिळत नाही.

  • वट सावित्रीच्या दिवशी महिलांनी तामसिक भोजन टाळावे. तसेच या दिवशी केस कापू नका.

Vat Purnima 2023
Budh Gochar 2023 : येणारे 17 दिवस या राशींसाठी आहेत अधिक कष्टाचे, बुडू शकतो पैसा, या गोष्टी लक्षात ठेवा

2. वटसावित्रीचा उपवास कसा ठेवाल?

  • वटसावित्रीचा उपवास ठेवण्याचे दोन मार्ग आहेत. पहिला मार्ग म्हणजे, वडाची पूजा करून झाल्यावर तुम्ही फळं खाऊन उपवास सोडू शकता.

  • दुसरा पर्याय म्हणजे वडाची पूजा करून झाल्यावर पूजेसाठी जे खाण्याचे पदार्थ नैवेद्याला दाखवले होते, ते तुम्ही उपवास सोडताना खाऊ शकता. उपवास सोडताना सात्विक पद्धतीचं अन्न खायाला हवे.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. याचा आमच्याशी कोणताही संबंध नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com