वसुबारसला कामधेनुची पुजा केल्याने लक्ष्मी कुबेर आपल्यावर प्रसन्न होतील. हिंदू धर्मानुसार कामधेनुचा जन्म समृद्रमंथनाच्या वेळी झाला आहे. कामधेनु गायीला हिंदू धर्मात विशेष स्थान आहे. कामथेनुची मुर्ती आपल्याजवळ असणे शुभ मानले जाते. जर तुम्ही कामधेनुची मुर्ती घरात ठेवली तर, घरात सुख समृद्धी, पैसा, धान्य याची चणचण लागत नाही. त्यामुळे वसुबारसला कामधेनू गायीची पुजा केली जाते.
वास्तुशास्त्रानुसार घरात सकारात्मकता ठेवण्यासाठी गायीची मुर्ती किंवा फोटो लावला जातो. शुक्रवारी अर्थात लक्ष्मी मातेच्या वारी कामधेनु घरी आणल्यास प्रचंड लाभ मिळतो. घरात कधीचं धनधान्य कमी होतं नाही. यंदा २८ ऑक्टोबर २०२४ ला दिवाळी सणाला सुरुवात होणार आहे. त्याचं दिवशी रमा एकादशी साजरी केली जाते त्याचसोबत वसुबारस हा सण साजरा केला जातो. त्यासाठी तुम्ही पुढील गोष्टींचे पालन करणे आवश्यक आहे. ज्या घरात कामधेनू गाईचे वासराचे छायाचित्र लावले जाते ते घर सुखाने भरलेले राहते. वासरासह कामधेनू गाईचा फोटो कोणत्या दिशेला लावावा आणि त्याचे फायदे जाणून घेऊया.
तुमच्या घरात कामाच्या किंवा पैशाच्या समस्या जाणवत असतील तर कामधेनुचा फोटो दक्षिणेला लावावा. वसुबारसला प्रतिमेची पुजा करावी.
घराच्या आग्नेय दिशेला कामधेनुचा फोटो लावल्याने घरात भांडण होत नाही. तसेच स्त्रीया आनंदी राहतात.
वास्तुशास्त्रानुसार, घराच्या पुर्व दिशेला गाईचा फोटो लावल्याने आर्थिक परिस्थिती सुधारते.
घराच्या उत्तर दिशेला गायीची मुर्ती ठेवल्याने कुबेराची कृपा होते आणि घरात समृद्धी वाढू लागते.
ईशान्य दिशेला तुम्ही गायीची मुर्ती लावल्याने घरातील लहान मुलांना फायदा होतो. त्यांनी वसुबारसला पुजा करणे शुभ ठरेल.
असे मानले जाते की घरामध्ये कुठेही वास्तुदोष असल्यास त्याचा प्रभाव कमी करण्यासाठी वासरासह कामधेनू गायीचा फोटो लावल्यास फायदा होतो.
टीप
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.
Written By: Sakshi Jadhav