Kitchen Vastu Tips: स्वयंपाकघर चुकीच्या दिशेने आहे का? या ३ फोटोंनी दूर होईल वास्तू दोष

Vastu Tips : तुमच्या घराचे स्वयंपाकघर चुकीच्या दिशेने असेल आणि वास्तूदोष जाणवत असेल तर तुम्ही ३ प्रकारची फोटो लावा. याच्यामदतीने तुम्ही त्या दोषापासून दूर होऊ शकतात. स्वयंपाकघर चुकीच्या दिशेने असणं हे वास्तुशास्त्रामध्ये योग्य मानले जात नाही.
Kitchen Vastu Tips
Kitchen Vastu Tipsindia mart
Published On

Kitchen Vastu Tips to avoid Vastu Dosh: 

हिंदू धर्मात अनेक धर्मग्रंथ आहेत, त्यापैकी एक म्हणजे वास्तुशास्त्र. यामध्ये घर, दुकान, दिशा आणि इतर गोष्टींची माहिती दिलीय. जो व्यक्ती वास्तुशास्त्रात सांगितलेल्या नियमांचे पालन करतो, त्याच्या जीवनात दुःख आणि गरिबी कमी येत असते. याउलट काम केल्यास अनेक प्रकारच्या संकटांना सामोरे जावे लागते.(Latest News)

वास्तुशास्त्रानुसार घराचा मुख्य दरवाजा असो किंवा बाथरूम किंवा स्वयंपाकघर (Kitchen), हे सर्व योग्य दिशेने असावे लागते. जर ते चुकीच्या दिशेने असतील तर घरामध्ये गरिबी आणि नकारात्मकता येत असते. अशा स्थितीत शारीरिक त्रासाव्यतिरिक्त व्यक्तीला इतर समस्यांना सामोरे जावे लागते. जर तुमच्याकडून अनवधानाने तुमच्या घरातील किचन चुकीच्या दिशेत बांधले गेले असेल तर वास्तूदोष लागत असतो. हे दोष कसे दूर करता येतील हे जाणून घेऊ..

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

या तीन दिशेला नसावे स्वंयपाक घर

  • घराच्या आग्नेय दिशेला स्वयंपाकघर नसावे.

  • घराच्या नैऋत्य कोपऱ्यात स्वयंपाकघर नसावे.

  • घराच्या वायव्य दिशेत स्वयंपाकघर नसावे.

काय होतात वाईट परिणाम ?

दरम्यान यामधील कोणत्याही दिशेला स्वयंपाकघर बांधल्यास अनेक प्रकारच्या समस्या उद्भवू शकतात. वास्तुदोषांसोबतच तुम्हाला अनेक प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते.घरातील स्त्री अनेक आजारांना बळी पडू शकते. विनाकारण खर्चात वाढ होते. घरातील कलह, आर्थिक समस्या आणि अपघात आदी समस्यांना तोंड द्यावे लागते. या चुकीच्या दिशेत स्वंयपाक घर बांधले गेले असेल आणि तुम्ही वास्तूदोषामुळे विविध संकटांना तोंड देत असाल तर त्यासाठी काही उपाय केले पाहिजे.

हे उपाय अधिक खर्चिक नाहीत. वास्तूदोषापासून वाचण्यासाठी तुम्हाला तुमच्या स्वंयपाक घरात तीन दिशेत तीन फोटो लावावे लागतील. वास्तुशास्त्रानुसार घराचे स्वयंपाकघर चुकीच्या दिशेला बांधले असेल तर सिंदूरी गणेशजींचा फोटो ईशान्य दिशेला लावणे शुभ असते. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही किचनमध्ये फळांचे चित्रही लावू शकता. याशिवाय यज्ञ करणाऱ्या ऋषींची चित्रे अग्निकोणात म्हणजे पूर्व आणि दक्षिण दिशेला लावता येतात. यामुळे घरातील नकारात्मक प्रभाव दूर होतो आणि वास्तुदोषही दूर होतात, अशी मान्यता आहे.

Kitchen Vastu Tips
Grah Gochar : ऐकलं का! 'या' तीन राशींच्या लोकांचे ८ते ९ दिवसात येतील अच्छे दिन; दूर होतील सर्व अडचणी

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com