वास्तुनुसार आपल्या घरातील प्रत्येक गोष्टीला विशेष महत्त्व आहे. घरातील प्रत्येक कोना हा सकारात्मकतेने भरलेला असेल तर सुख-समृद्धी नांदते. परंतु, आपल्या काही चुकांमुळे घरात नकारात्मकता येते, पैशांची चणचण भासते. त्यामुळे घरात नकारात्मकतेचा सामना करावा लागतो.
वास्तुशास्त्रानुसार आपल्या घरात (home) सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते ती देवघर. घरामध्ये हॉलरुम, बेडरुम, स्टडी रुम, किचन (Kitchen) अशा अनेक गोष्टी योग्य दिशेला असतील तर घरात कधीच अडचणी येत नाही. हल्ली छोट्या घरांमुळे आपण स्वयंपाकघरात देवघर बनवतो. परंतु,वास्तुशास्त्रानुसार (vastu Tips) असे करणे योग्य आहे का? देवघराची दिशा कोणती जाणून घेऊया सविस्तर
देवघरासाठी सगळ्यात चांगली दिशा ही ईशान्य मानली जाते. पूजा कक्ष किंवा छोटं मंदिर असल्याने घरात धनाची कमतरता होत नाही.
घरात पाहुण्याची खोली वायव्य कोपऱ्यात असायला हवी. ज्यामुळे पाहुणे समाधानी राहातील तसेच त्याच्यात सकारात्मक ऊर्जा भरलेली असेल.
मुलांच्या अभ्यासाची खोली ही ईशान्य दिशेला बनवावी ज्यामुळे देवी सरस्वती प्रसन्न होते. गरज असेल तर खोली घराच्या पूर्व किंवा उत्तर दिशेलाही बनवू शकता.
स्वयंपाकघर हे घराच्या आग्नेय दिशेला असायला हवे. ज्यामुळे घरातील सदस्यांचे आरोग्य निरोगी राहाते. तसेच घरात कोणत्याही गोष्टींची कमतरता भासत नाही.
बेडरुम दक्षिण-पश्चिम दिशेला असायला हवी. जोडप्यांची खोली ही नैऋत्य दिशेला असल्यास पती- पत्नीच्या नात्यात गोडवा टिकून राहातो.
स्टोअर रुमची दिशा ही दक्षिण-पश्चिम कोपऱ्यात असायला हवी. ज्यामध्ये घरातील सर्व उपयुक्त वस्तू ठेवता येतील.
तिजोरी ही नेहमी दक्षिणाभिमुख भिंतीवर असायला हवी. जेव्हा तिजोरी उघडाल तेव्हा तिचे तोंड हे उत्तरेकडे असायला हवे.
टीप : येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.