Vastu Tips : आरशाप्रमाणे चमकेल तुमचं नशीब, वास्तूशास्त्रानुसार कोणत्या दिशेला आरसा लावायचा ते पाहा

Vastu Tips For Mirror : आजच्या युगात घर बांधताना अनेक लोक वास्तूचे नियम पाळतात. तर काही वास्तू तज्ज्ञांचा सल्ला देखील घेतात. परंतु काहीवेळेस आपल्या एका चुकीमुळे घरात नकारात्मक ऊर्जेचा सामना करावा लागतो.
Vastu Tips For Mirror
Vastu Tips For MirrorSaam Tv
Published On

Vastu Tips For Home :

आजच्या युगात घर बांधताना अनेक लोक वास्तूचे नियम पाळतात. तर काही वास्तू तज्ज्ञांचा सल्ला देखील घेतात. परंतु काहीवेळेस आपल्या एका चुकीमुळे घरात नकारात्मक ऊर्जेचा सामना करावा लागतो.

यामुळे व्यक्तीच्या जीवनात अडचणी येतात. चिंता आणि तणाव निर्माण होतो. घरामध्ये अशा अनेक गोष्टी असतात ज्या आकर्षित असतात. त्यातील एक म्हणजे घराचा आरसा. घरातील आरशांची जागा चुकली की, काही अघटित घटनांना सामोरे जावे लागते. त्यासाठी जाणून घेऊया वास्तूशास्त्रानुसार (Vastu Tips) घरातील आरशाची योग्य दिशा कोणती.

  • घराच्या (Home) उत्तरेकडील किंवा पूर्वेकडील भिंतींवर कोणत्याही प्रकारचा आरसा, काच किंवा काचेचे शोपीस लावल्यास ती दिशा शुभ मानली जाते.

  • या दिशेला आरसा ठेवल्याने घरातील लोकांची आर्थिक स्थिती चांगली राहाते. नेहमी दक्षिणेकडील किंवा पश्चिम भिंतीवर आरसा लावणे टाळावे. वास्तूनुसार आरशाची दिशा अधिक महत्त्वाची ठरते.

  • घरामध्ये चुकीच्या पद्धतीने आरसा लावल्याने नुकसान होते. त्यासाठी दोन आरसे कधीही समोरासमोर लावू नये. ज्यामुळे नकारात्मक ऊर्जा निर्माण होईल.

  • आरसा हा नेहमी ड्रेसिंग रुम आणि वॉशरुम सोडून डायनिंग टेबलच्या समोर लावू शकता. तसेच स्वयंपाकघरात कधीही आरसा लावू नका.

Vastu Tips For Mirror
Vastu Tips : वास्तूशास्त्रानुसार स्वयंपाकघरात या वस्तू चुकूनही ठेवू नका, सुख-शांती होईल भंग; भासेल आर्थिक चणचण
  • वास्तुशास्त्रात चौरस आणि आयताकृती आकारांना नेहमी शुभ मानले जाते. ओव्हल आणि सर्कल मिरर घरासाठी लाभदायक असतो. जर तुम्ही याप्रकारचा आरसा तुमच्या लॉकरमध्ये ठेवल्यास संपत्ती (Money) वाढ होऊ शकते. कर्जाच्या परिस्थितीपासून दूर राहू शकता.

टीप : येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com