Vastu Tips : वास्तूशास्त्रानुसार स्वयंपाकघरात या वस्तू चुकूनही ठेवू नका, सुख-शांती होईल भंग; भासेल आर्थिक चणचण

Vastu Tips For Kitchen : आपल्या घरातील प्रत्येक भाग हा अधिक महत्त्वाचा असतो. त्या ठिकाणी नकारात्मक ऊर्जा निर्माण झाल्यास आपल्याला अनेक संकटांचा सामना करावा लागतो. आपल्या घरातील स्वयंपाकघर हे सकारात्मक असणे अधिक महत्त्वाचे आहे.
Vastu Tips
Vastu Tips Saam tv

Vastu Tips For Home :

वास्तूशास्त्रानुसार ज्या घरात सुख-शांती आणि आनंद असतो त्याच घरात देवी लक्ष्मीचाही वास असतो. त्यामुळे आपल्या घरातील वातावरण हे नेहमी आनंदी असायला हवे.

आपल्या घरातील (Home) प्रत्येक भाग हा अधिक महत्त्वाचा असतो. त्या ठिकाणी नकारात्मक ऊर्जा निर्माण झाल्यास आपल्याला अनेक संकटांचा सामना करावा लागतो. आपल्या घरातील स्वयंपाकघर (Kitchen) हे सकारात्मक असणे अधिक महत्त्वाचे आहे. अशावेळी चुकून किंवा नकळतपणे अशा काही गोष्टी घडतात ज्याचा आपल्यावर नकारात्मक परिणाम होतो.

स्वयंपाकघरात नकारात्मक ऊर्जा निर्माण झाल्यास त्याचा आपल्या अन्नावर परिणाम होतो. ज्याचा आपल्या आरोग्यावरही परिणाम होऊ शकतो. त्यामुळे स्वत:ला आणि तुमच्या कुटुंबाला निरोगी ठेवण्यासाठी आणि घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण व्हावी यासाठी स्वयंपाकघरात जर तुम्ही देखील या वस्तू ठेवत असाल तर आजच फेकून द्या. जाणून घेऊया वास्तू टिप्स

Vastu Tips
Makar Sankranti 2024 : तब्बल ७७ वर्षांनंतर जुळून आला शुभ संयोग! या ५ राशी ठरतील नशिबवान, पडेल पैशांचा पाऊस

1. स्वयंपाकघरात कोणत्या वस्तू ठेवू नये?

  • स्वयंपाकघरात मळलेले पीठ जास्त वेळ ठेवू नका. अनेकांना मळलेले पीठ फ्रीज किंवा किचनमध्ये ठेवण्याची सवय असते. त्यामुळे राहू आणि शनिचा नकारात्मक प्रभाव पडतो. आणि घरात नकारात्मक ऊर्जा वाढते.

  • स्वयंपाकघरात अनेकजण आरसा लावतात. अशावेळी लावलेल्या काचेमुळे नकारात्मक ऊर्जा निर्माण होते. स्वयंपाकघरात आरसा लावल्याने घरातील सुख-शांती हिरावली जाते.

  • स्वंयपाकघरातील धुळीमुळे नकारात्मक ऊर्जा निर्माण होते. त्याचबरोबर रात्रीच्या वेळी स्वयंपाकघरात खरकटी भांडी कधीही ठेवू नका. यामुळे लक्ष्मी देवी नाराज होते आणि तुमची आर्थिक स्थितीही बिघडू शकते.

  • काही लोकांना किचनमध्ये औषधे ठेवण्याची सवय असते. स्वयंपाकघरात औषध ठेवल्याने घरातील सदस्यांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो.

  • घराच्या किचनमध्ये तुटलेली किंवा तडा गेलेली भांडी ठेवू नका. त्यामुळे सुख-समृद्धी नष्ट होते. आर्थिक स्थिती विस्कळते. अनेक काम देखील बिघडू शकतात.

टीप : येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com