Vastu Tips : घरात सतत नकारात्मकता जाणवते? वास्तूनुसार ही रोपे दारात लावा, कधीच भासणार नाही पैशांची चणचण

Vastu Plants : वास्तुशास्त्रानुसार घरात काही रोपटे लावल्याने सकारात्मक ऊर्जा मिळते. तसेच आर्थिक संकटांपासून सुटका होते. तसेच ही रोपे घराच्या उत्तर दिशेला लावल्याने तुमची आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होईल.
Vastu Tips
Vastu Tips Saam tv
Published On

Vastu Tips For Home :

वास्तुशास्त्रानुसार घरातील प्रत्येक दिशा आणि कोना हा महत्त्वाचा असतो. परंतु, बरेचदा घरात नकारात्मकता जाणवते ज्यामुळे आपापसात वाद होतात. मानसिक ताणाला सामोरे जावे लागते.

वास्तुशास्त्रानुसार घराची उत्तर दिशा नेहमी स्वच्छ ठेवली पाहिजे. या दिशेला देवी लक्ष्मीचा वास असल्याचे म्हटले जाते. असे म्हटले जाते की, वास्तुशास्त्रानुसार (Vastu Tips) घरात काही रोपटे लावल्याने सकारात्मक ऊर्जा मिळते. तसेच आर्थिक संकटांपासून सुटका होते. तसेच ही रोपे घराच्या उत्तर दिशेला लावल्याने तुमची आर्थिक (Money) स्थिती सुधारण्यास मदत होईल, तसेच देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त होईल. जाणून घेऊया वास्तूनुसार कोणते रोपटे घरात लावयला हवे.

1. केळीचे झाड

उत्तर दिशेला केळीचे झाड लावून दर गुरुवारी त्याची पूजा केल्याने भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची कृपा सदैव राहाते. तसेच दर गुरुवारी तुपाचा दिवा लावल्याने सौभाग्य प्राप्त होते. जीवनातील अनेक संकटे दूर होतात.

Vastu Tips
Budh Gochar 2024 : बुध ग्रहाचे धनु राशीत संक्रमण! कामात येतील अडचणी, प्रेमसंबंधात दूरावा

2. तुळशीचे रोप

हिंदू धर्मात तुळशीला अधिक महत्त्व आहे. तिला लक्ष्मीचे रुप मानले जाते. त्यामुळे उत्तर दिशेला तुळशीचे रोप लावावे. यामुळे संपत्ती येईल. रखडलेली कामे पूर्ण होतील.

3. बांबूचे रोप

वास्तुशास्त्रानुसार बांबूचे रोप लावल्याने घरात सुख-शांती नांदते. हे रोप घराच्या उत्तर दिशेला लावावे. ही वनस्पती घरात (Home) सकारात्मकता आणते तसेच गुड लक चार्म म्हणून काम करते.

Vastu Tips
Vastu Tips : वास्तूशास्त्रानुसार नवीन वर्षात या दिशेला लावा घोड्याची नाळ, पैशांची चणचण होईल कमी; शनिदेवाची राहिल कृपा

4. मनी प्लांट

मनी प्लांटमुळे भाग्य उजळण्यास मदत होते. त्यामुळे घराच्या उत्तर दिशेला पारदर्शक काचेच्या बाटलीत मनी प्लांट लावा. तसेच याची वेल लटकणार नाही याची काळजी घ्या.

टीप : येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com