Flu: फ्लूवर मात करण्यासाठी लसीकरण फायदेशीर; ऑफिसमध्ये स्वतःची 'अशी' घ्या काळजी

सर्दी-खोकल्‍यासह होणाऱ्या या फ्लू आजारामुळे दैनंदिन कामात मोठा अडथळा निर्माण होतो. स्‍वत:चं या आजारापासून संरक्षण करण्‍यासाठी लसीकरण हा सर्वात प्रभावी मार्ग मानला जातो.
Flu
Flusaam tv
Published On

दरवर्षी जगभरातील लाखो व्‍यक्‍तींना फ्लूचा त्रास आजार होतो. दरवर्षाला १ बिलियनहून अधिक प्रकरणं फ्लूची आढळून येतात. यामध्‍ये ३ ते ५ दशलक्ष प्रकरणं गंभीर असून ज्यामुळे हा आजार हंगामी आजारांपेक्षा अधिक घातक आहे. सर्दी-खोकल्‍यासह होणाऱ्या या फ्लू आजारामुळे दैनंदिन कामात मोठा अडथळा निर्माण होतो. स्‍वत:चं या आजारापासून संरक्षण करण्‍यासाठी लसीकरण हा सर्वात प्रभावी मार्ग मानला जातो. मातर याबाबत पुरेश जागरूकता नाही.

श्रमजीवी व्‍यावसायिकांना फ्लू होण्‍याचा धोका जास्त आहे. त्याचप्रमाणे ऑफिसमध्ये काम करणारे कर्मचारी असो किंवा लहान कारखान्‍यामध्‍ये काम करणारे कर्मचारी असा फ्लूचा जीवनावर परिणाम होऊ शकतो. अनेक लोक आजारी असताना देखील कामावर जातात, परिणामत: कामावर लक्ष लागत नाहीत. यामुळे या समस्येचा धोका वाढतो. तसेच, डॉक्टरांकडे जाण्‍याच्या, औषधोपचारांचा आणि हॉस्पिटलमध्‍ये भरती होण्‍याच्या खर्चांमुळे अधिक तणाव येऊ शकतो.

Flu
High बीपी किती असला पाहिजे? कधी ठरतो धोकादायक?

अॅबॉट इंडियाचे मेडिकल डायरेक्‍टर डॉ. जे.जो करणकुमार यांनी सांगितलं की, “फ्लूचा कामाच्‍या ठिकाणी परिणाम होऊ शकतो. भारतात आरोग्‍यसेवा सिस्‍टमवर संसर्गजन्‍य आजारांचा मोठा दबाव आहे. परिणामी फ्लू लसीकरणाबाबत जागरुकता वाढवणं गरजेचं आहे. लसीकरण केल्‍यास तुमचं फ्लूपासून संरक्षण होते. तुमचं संरक्षण होण्‍यासोबत सार्वजनिक आरोग्‍य देखील उत्तम राहण्‍यास मदत राहतं. ज्‍यामुळे फ्लूच्‍या प्रादुर्भावामुळे होऊ शकणाऱ्या आर्थिक आणि सामाजिक समस्‍या कमी होऊ शकतात.'

Flu
AI in Healthcare : केवळ आवाज ऐकून समजणार डायबेटीज झालाय की नाही; AI चा नवा चमत्कार करेल हैराण

दरम्यान याबाबत मुंबईतील बॉम्‍बे हॉस्पिटलचे चेस्‍ट मेडिसीनचे सीनियर कन्‍सल्‍टण्‍ट डॉ. सुजीत के. राजन यांनी सांगितलं की, “फ्लू लस सुरक्षित असून दरवर्षी सर्वात सामान्‍य व्हायरस स्‍टेन्‍सनुसार अपडेट करण्यात येते. जागतिक आरोग्‍य संघटना फ्लू विषाणूंवर देखरेख ठेवते. त्याचप्रमाणे इन्‍फ्लूएन्‍झा सीझन्‍ससाठी वर्षातून दोनदा लस अपडेट केल्या जातात. 65 वर्षांनंतर निरोगी जीवनशैली कायम राखणं आणि प्रत्येक वर्षी लस घेणं हे स्वतःचे संरक्षण करण्याची सर्वोत्तम पद्धत आहे.

डॉ. राजन पुढे म्हणाले, काही अशक्त प्रतिकारशक्ती असलेल्या 65 वर्षांखालील रुग्णांनाही वार्षिक इन्फ्लूएंझा लसीकरणाचा फायदा होऊ शकतो. दरवर्षी एकदा लस घेतल्‍यास फ्लूची तीव्रता मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकते. शिवाय यामुळे न्‍यूमोनियापासून संरक्षण होऊ शकते.

Flu
World Obesity Day: काही केल्या बेली फॅट कमी होत नाहीये? तज्ज्ञांनी सांगितलं हार्मोन्सच्या 'या' टेस्ट आजच करून घ्या

कशी काळजी घ्याल?

कामाच्‍या ठिकाणी सुरक्षित राहण्‍यासाठी नियमितपणे हात स्‍वच्‍छ धुवा आणि खोकताना किंवा शिंकताना नाक-तोंड झााकून ठेवणं तुमच्या फायद्याचं ठरणार आहे. याशिवाय बरं वाटत नसल्‍यास घरीच राहा, ज्‍यामुळे फ्लूचा प्रसार होणार नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com