Health Risks : भांडी घासायला महिनाभर एकच स्पंज वापरताय? तर सावधान! अन्यथा होतील 'हे' गंभीर आजार

Health Tips : पुर्वी भांडी घासण्यासाठी काथ्याचा वापर केला जायचा. स्टील किंवा ॲल्यूमिनियमच्या बारीक तारांपासून तयार केलेल्या या काथ्यापासून भांडी घासली की, भांडीही चकाचक साफ व्हायच, चिवटपणा दूर व्हायचा.
Health Risks
Kitchen scrub side effectsaam tv
Published On

पुर्वी भांडी घासण्यासाठी काथ्याचा वापर केला जायचा. स्टील किंवा ॲल्यूमिनियमच्या बारीक तारांपासून तयार केलेल्या या काथ्यापासून भांडी घासली की, भांडीही चकाचक साफ व्हायच, चिवटपणा दूर व्हायचा. पण हळूहळू स्टील, ॲल्यूमिनियमची भांडी जाऊन नॉनस्टीक, काच किंवा सिरॅमिक भांड्यांचा वापर केला जात आहे. त्यामुळे लोक आता स्पंच किंवा ब्रशचा वापर भांड्यासाठी करायला लागले आहेत.

आता भांडी घासायले जास्त मेहनत घ्यावी लागत नाही. त्यासाठी अनेक लिकवीट्स आले आहेत. गॅस्ट्रोलॉजिस्ट, किम्स किंग्सवे हॉस्पिटलचे डॉ. समीर पाटील यांच्या म्हणण्यानुसार टॉयलेट सीटवर जेवढे बॅक्टेरिया असतात त्यापेक्षा जास्त बॅक्टेरिया या स्पंच आणि ब्रश मध्ये असतो. स्पंच आणि ब्रश मधला ओलावा जास्त असल्यामुळे जास्त बॅक्टेरिया ग्रो होत असतो.

Health Risks
New Year Destinations : न्यू इयरसाठी कुठे फिरायला जायच ठरवत असाल; तर, भेट द्या महाराष्ट्रातील 'या' खास ठिकाणांना

आपण तितकं पौष्टीक अन्न खातो. तेवढीचं स्वच्छ आपली भांडी असली पाहीजे. त्यासाठी लागणारा स्पंच हा सतत स्वच्छ केला पाहिजे. तो स्वच्छ करण्यासाठी क्लोरीन किंवा उकडत्या पाण्यामध्ये स्पंच धुवून कोरडा करण्यासाठी ठेवला पाहिजे. तसेच वेळीच तो बदलला पाहिजे. शक्यतो आठवडाभर तुम्ही एक स्पंच वापरू शकता.

स्पंच वेळीचं स्वच्छ केला नाही तर डॉ. समीर पाटील म्हणतात, ''स्पंजेस मध्ये बॅक्टेरिया तयार होऊ शकतो. यापासून टायफॉईड किंवा हगवण सुद्धा या समस्यासुद्धा होऊ शकतात. ज्यांना पोटाचे आजार, डायबिटीज, किंवा रोगप्रतिकार क्षमता कमी असणारे औषध सुरू आहे त्यांच्यासाठी अत्यंत घातक ठरू शकतो. त्यात तुम्हाला सिव्हियर डायरिया झाला तर किडनीवर परिणाम होऊ शकतो.

यासाठी र डॉ. समीर पाटील म्हणतात, या स्पंचला टूथब्रश सारखं ट्रीट केलं पाहिजे. साधारणता दोन ते तीन महिन्याने भांडी धुवायचा स्पंच बदलायला पाहिजे. तेच स्पंज असेल तर ते दर महिन्याला बदलले पाहिजे. ब्लिच किंवा क्लोरीने उपयोग झाल्यानंतर त्याला स्वच्छ केला पाहिजे आणि कोरडं करून वाळून घेतलं पाहिजेॉॉॉया ब्रशेस पेक्षा ग्रामीण भागामध्ये वापरली जाणारी राखाड जास्त स्वच्छ आहे असेही तज्ज्ञ म्हणाले आहेत.

Health Risks
Christmas Wishes : यंदाच्या ख्रिसमसला तुमच्या मित्राला पाठवा खास शुभेच्छा, पाहा Top 10 मेसेज

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com