

नवजात बाळांसाठी आईचं दूध हे सर्वात उत्तम आहार मानला जातो. मात्र बिहारमधील सहा जिल्ह्यांमध्ये आईच्या दुधात घातक यूरेनियम आढळून आलंय. यामुळे नवजातांमध्ये कॅन्सरचा धोका वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. नेचर या जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासात स्पष्ट झाले आहे की बिहारातील सहा जिल्ह्यांतील प्रत्येक स्तनपान करणाऱ्या आईच्या दुधात यूरेनियमचे अंश आहेत.
याचा अर्थ असा की, भूगर्भातील पाण्यात दीर्घकाळापासून असलेला हा विषारी घटक थेट नवजात शिशूंना त्यांच्या पहिल्या आणि सर्वात महत्त्वाच्या पोषण स्रोताद्वारे मिळतोय. हे संशोधन पटनाच्या महावीर कॅन्सर संस्थानातील डॉ. अरुण कुमार आणि प्रा. अशोक घोष यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलंय. यात AIIMS, नवी दिल्लीच्या बायोकेमिस्ट्री विभागातील डॉ. अशोक शर्मा आणि त्यांची टीमही सहभागी होती.
ऑक्टोबर 2021 ते जुलै 2024 दरम्यान झालेल्या या अभ्यासात भोजपूर, समस्तीपूर, बेगूसराय, खगडिया, कटिहार आणि नालंदा या ठिकाणच्या 17 ते 35 वर्षे वयोगटातील 40 मातांच्या दुधाचे नमुने तपासण्यात आले. सर्व नमुन्यांमध्ये यूरेनियम (U-238) आढळलं, ज्याची मात्रा 0 ते 5.25 µg/L इतकी होती. आईच्या दुधात यूरेनियमची सुरक्षित मर्यादा निश्चित केलेली नाही. अहवालानुसार, सुमारे 70 टक्के शिशूंना इतक्या प्रमाणात यूरेनियमचा संपर्क झाला ती त्यामुळे कॅन्सरेतर आजार किंवा व्याधीस कारणीभूत ठरू शकतो.
अभ्यासाचे सहलेखक AIIMS दिल्लीचे डॉ. अशोक शर्मा यांनी सांगितलं, “40 स्तनपान करणाऱ्या मातांच्या दुधाच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली. सर्व नमुन्यांमध्ये यूरेनियम (U-238) आढळलं. जरी 70 टक्के मुलांमध्ये कॅन्सरचा धोका जरी दिसला नाही तरी एकूण यूरेनियमचं प्रमाण ठरवलेल्या मर्यादेपेक्षा कमी होते. त्यामुळे आई आणि मुलांच्या आरोग्यावर प्रत्यक्ष परिणाम फारसा होणार नाही अशी अपेक्षा आहे.”
त्यांनी पुढे सांगितलं की, “यूरेनियममुळे बालकांच्या न्यूरोलॉजिकल विकासात अडथळे येऊ शकतात आणि IQ कमी होण्याचा धोका असतो. असं जरी असलं तरीही स्तनपान थांबवू नये, जोपर्यंत क्लिनिकली पुरावा मिळत नाही. आईचं दूध हे मुलांच्या पोषणाचे सर्वात फायदेशीर मानलं जातं.”
बिहारात पिण्याच्या पाण्यासाठी आणि सिंचनासाठी भूजलावर मोठ्या प्रमाणात अवलंबून राहतात. रासायनिक खत-कीटकनाशकांचा दीर्घकाळ वापर यामुळे आधीच आर्सेनिक, शिसे आणि पारा यांसारख्या धातूंनी प्रदूषण वाढलंय. आता आईच्या दुधात यूरेनियम आढळल्याने हे स्पष्ट झालं आहे की, प्रदूषण थेट नवजात शिशूंना पोहोचू लागलं आहे.
नवजातांवर यूरेनियमचा परिणाम वेगाने होतो कारण त्यांचं शरीर विकासाच्या अवस्थेत असतं. ते टॉक्सिन धातू लवकर शोषून घेतात. कमी वजनामुळे त्यांच्यावर एक्सपोजरचा परिणाम अधिक होतो. यूरेनियममुळे किडनीचं नुकसान, न्यूरोलॉजिकल समस्या आणि भविष्यात कॅन्सरचा धोका वाढू शकतो.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.