Ear Bud Use : इअर बड्सने कान साफ करताय? सावधान, बहिरेपणा येईल, त्याआधीच जाणून घ्या योग्य पद्धत

Ear Bud Use : प्रत्येक व्यक्तीच्या कानात मळ तयार होत असतो. हा मळ वाढला की आपण तो काढून टाकतो. मळ जास्त साठल्यास कॉटन इअर बड्सने तो काढताना वेदना होतात.
Ear Bud Use
Ear Bud UseSaam TV

कानातील मळ साफ करण्यासाठी अनेकजण विविध पद्धती वापरतात. यातील सामान्य पद्धत म्हणजे अनेक नागरिक कॉटन इअर बड्सने कान साफ करतात. मात्र असे केल्याने तुम्ही बहीरे होऊ शकता. तुमची ऐकण्याची क्षमता कमी होऊन कानाचा पडदा फाटू शकतो. त्यामुळे आज कॉटन इअर बड्सने कान साफ केल्यावर होणारे परिणाम जाणून घेऊ.

Ear Bud Use
Ears Numb in Winter : हिवाळ्यात कान सुन्न होतात? अशी घ्याल काळजी

कमी ऐकू येतं

प्रत्येक व्यक्तीच्या कानात मळ तयार होत असतो. हा मळ वाढला की आपण तो काढून टाकतो. मळ जाल्त साठल्यास कॉटन इअर बड्सने मळ काढताना वेदना होतात. कारण कॉटन इअर बड्स काहीवेळा कानाच्या पडद्यारर्यंत पोहचतात. त्यामुळे आपल्याला ऐकण्यास कमी येतं.

कानाचा पडदा फटतो

आपल्या कानांवर पडणारा ध्वनी हा पडद्याला पार करून पुढे जात असतो. कान कॉटन इअर बड्सने साफ करत असताना मळ मागे फिरत जातो. कॉटन इअर बड्सने मळ मागे ढकलला जाऊन पडद्यावर चिकटतो. पडदा साफ करताना तुमच्या कानाचा पडदा देखील फाटू शकतो.

कानात मुंग्या जाण्याची भीती

आपण जेव्हा अशा पद्धतीने कानातील मळ काढतो तेव्हा कॉटन इअर बड्सला असलेला कापूस स्वच्छ असणे गरजेचं आहे. अनेकदा कापूस कुढेतरी पडलेला असतो. त्यामुळे या कापसात मुंग्या किंवा अन्य काही किटक जाण्याची शक्यता असते. कॉटनला चिकटून राहिलेले किटक कान साफ करताना कानात जातात.

कान साफ करण्याची योग्य पद्धत

आपल्या शरीरातील ज्ञानेंद्रीयामधील एक म्हणजे कान आहेत. त्यामुळे त्यांना फार जपा. कानात तयार होणारा मळ काढण्यासाठी डॉक्टरांची मदत घ्या. घरच्याघरी कॉटन इअर बड्स किंवा माचिसची काडी आणि कोणतीही तिक्ष्ण वस्तू कानात टाकू नका. त्याने तुमच्या कानाला इजा होईल आणि कान ठणकू लागेल . त्यामुळे कान घरच्याघरी साफ करूनयेत. डॉक्टारांचा सल्ला घ्या, त्याशिवाय कान साफ करू नयेत.

Ear Bud Use
Ear Piercing Benefits : लहानपणी कान टोचण्याचे केवळ कानांसाठीच नाही तर डोळ्यांसाठीही फायदे, जाणून घ्या

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com