Child Care Tips : मुलांना उन्हाळ्याची सुट्टी लागली आहे. अशातच बाहेर मैगानाक खेळताना त्यांना सतत भूक लागते. खेळताना मुले अनेकदा पुरेशा प्रमाणात पाणी पित नाही. याबाबत पालकांना चिंता असते.
लहान मुलांना (Child) स्वस्थ व हायड्रेटेड ठेवणे आवश्यक आहे, पण ते नेहमी सोपे नसते. अॅबॉटच्या न्यूट्रीशन व्यवसायाच्या मेडिकल व सायण्टिफिक अफेअर्सचे संचालक डॉ. गणेश काढे 6 पौष्टिक व हायड्रेटिंग खाद्यपदार्थांबाबत सांगत आहेत, जे तुम्ही तुमच्या लहान मुलांना यंदा उन्हाळ्यामध्ये सेवन करायला देऊ शकता.
1. कापलेली फळे:
कलिंगड, संत्री (Orange) व दर्जाळू यांसारखी रसाळ फळे तुमच्या मुलांचे हायड्रेशन वाढवू शकतात. पाणी संपन्न प्रमाणात असण्यासोबत ही फळे व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए व पोटॅशियमचा उत्तम स्रोत देखील आहेत, ज्यांचे अनेक आरोग्यविषयक फायदे आहेत. ही फळे लहान तुकड्यांमध्ये किंवा त्रिकोणाकृती, तारे व गोलाकार अशा विविध आकारांमध्ये सर्व्ह करता येऊ शकतात.
2. पॉपसिकल्स :
लहान मुलांना पॉपसिकल्स खूप आवडतात. तुमच्या मुलाला पुरेशा प्रमाणात पाणी पिण्यास देणे आव्हानात्मक वाटत असेल तर तुम्ही लहान ग्लासमध्ये ताज्या फळांच्या रसापासून पॉपसिकल किंवा त्यांचे आवडते फ्रूट (fruit) मिल्कशेक्स बनवू शकता. थंडगार पेयांचा आस्वाद घेण्याची इच्छा असलेल्या मुलांसाठी हे सर्वोत्तम पर्याय आहेत. हे पॉपसिकल्स फळांमधून द्रव व प्रमुख पौष्टिक घटक देखील देऊ शकतात, ज्यामुळे त्यांना रिहायड्रेट होण्यास मदत होऊ शकते.
3. फ्रूट लस्सी:
तुमचे मूल पाणी पिण्यापासून टाळाटाळ करत असेल तर त्यांना दही व दूधापासून बनवलेली लस्सी सेवन करण्यास द्या. लस्सी पिण्यास त्यांचे लक्ष वेधून घेण्यासाठी त्यांच्या आवडत्या कपमध्ये लस्सी देता येऊ शकते आणि सोबत त्यांच्या आवडत्या रंगातील लहान स्ट्रॉ देता येऊ शकतो. तुम्ही पपई व अननस लस्सी बनवू शकता, जी तुमच्या मुलांच्या चवींना साजेसी आहे. तसेच अननसमध्ये पाण्याचे उच्च प्रमाण असण्यासोबत व्हिटॅमिन सी देखील मोठ्या प्रमाणात असते, ज्यामुळे हा सर्वोत्तम समर फ्रूट पर्याय आहे. तसेच पपईमध्ये व्हिटॅमिन ए व सी संपन्न प्रमाणात असते
4. व्हेजिटेबल सलाड:
मिक्स व्हेजिटेबल सलाड हा प्रथिने व फायबरचे उत्तम स्रोत आहे. काकडी, टरबूज, ऑलिव्ह आणि चेरी टोमॅटो यांसारख्या रसाळ पिवळ्या व हिरव्या भाज्यांचा समावेश असलेले सलाड उन्हाळ्यातील उत्तम चवदार पर्याय असू शकते.
5. चहाची पार्टी:
मुलांना मुलांसाठी अनुकूल चहा द्या, जसे पेपरमिंट किंवा कॅमोमाइल. टेडी बेअर किंवा डॉल टी पार्टीच्या आयोजनामुळे काही मुलांना चहा पिण्यास व हायड्रेट राहण्यास प्रेरित करता येऊ शकते. पेपरमिंटमधील नैसर्गिक संयुगांचा शारीरिक उर्जेवर, तसेच तुमच्या मुलाच्या खेळण्याच्या वेळेवर लाभदायक प्रभाव पडू शकतो. तसेच कॅमोमाइल चहामध्ये दाहक-विरोधी गुण असतात आणि कॅल्शियम, मॅग्नेशियम व फोलेट सारख्या पौष्टिक घटकांचे प्रमाण जास्त असते.
6. स्पा वॉटर :
स्पा वॉटर लहान मुलांसाठी देखील आहे! मुलांच्या पाण्याच्या ग्लासमध्ये तुकडे केलेले स्ट्रॉबेरी, काकडी किंवा लिंबू टाका आणि पाण्याचा स्वाद वाढवा. या घटकांमध्ये हायड्रेटिंग गुणधर्म आहेत आणि मुलांचे लक्ष वेधून घेतील. बेरी देखील पाण्याला गोड स्वाद देऊ शकतात आणि लक्षवेधक कलर पॉपसाठी पाण्यामध्ये टाकले जाऊ शकतात.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.