India's Best Beaches: भारतातील सुंदर समुद्रकिनाऱ्यांची सफर, येथे नक्की भेट द्या!

Top Beaches In India : भारत देशाला तिन्ही बाजूंनी समुद्राने वेढलेले आहे.
India's Best Beaches
India's Best Beaches Saam Tv
Published On

Travel Destination In India :

दरी, डोंगर, हिरवी झाडी अन् निळाशार समुद्र अशी भारत देशाची ओळख आहे. भारत देश निसर्गाने समृद्ध आहे. देशाला तिन्ही बाजूंनी समुद्राने वेढलेले आहे. देशातील समृद्र किनारे अतिशय सुंदर आहेत. यापैकी काही समुद्रकिनाऱ्यांची माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत.

भारताला विस्तृत समुद्रकिनारा लाभलेला असून समुद्नकिनारेदेखील अद्भुत अनुभव देतात. भारतातील समुद्रकिनाऱ्यावर पर्यटकांची गर्दी पाहायला मिळते. देशातील या समुद्रकिनारी सर्वांनाच फिरायला नक्की आवडेल.

India's Best Beaches
World Arthritis Day: संधिवात झाल्यास या पदार्थांचे सेवन करणे टाळा; अन्यथा...

मरीना बीच

चैन्नई शहरातील सर्वात मोठं पर्यटन स्थळ म्हणजे मरीना बीच. हा बीच पर्यटकाच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू आहे. मरीना बीचचा किनारा १३ किमी लांबीचा आहे. हा देशातील सर्वात लांब नैसर्गिक समुद्रकिनारा आहे. तर जगातील दुसरा सर्वात मोठा समुद्रकिनारा आहे.

कलंगुट बीच, गोवा

गोवा म्हणजे पर्यटकांचे आवडते शहर. गोवा शहर निसर्ग आणि समुद्रकिनाऱ्यांनी समृद्ध आहे. गोव्यातील कळंगुट बीच हा लोकप्रिय समुद्रकिनारा आहे. येथे तुम्हाला वॉटर स्पोर्ट्स, पॅरासेलिंग, वॉटर सर्फिंग, जेट स्कीइंग यांसारख्या वॉटर स्पोर्ट्सचा आनंद घेता येईल. गोव्यात येणारे अनेक पर्यटक या बीचला आवर्जून भेट देतात.

पुरी बीच,ओडिशा

ओडिशाला निसर्गाने वेढलेले आहे. तेथील पुरी बीच हा खूप प्रसिद्ध आहे. येथील सुर्योदय आणि सुर्यास्ताचा नजारा पाहण्यासारखा असतो. येथे पर्यटक मोठ्या प्रमाणात गर्दी करतात.

वरकला बीच,केरळ

केरळचा वरकला बीच हा योग आणि आयुर्वेदासाठी प्रसिद्ध आहे. येथे पर्यटक आराम आणि मन शांत करण्यासाठी येतात. किनाऱ्याच्या बाजूला उंच ताडाची झाडे तर दुसरीकडे अरबी समुद्राचे नयनरम्य दृश्य पाहण्यासारखे असते.

तारकर्ली,महाराष्ट्र

महाराष्ट्राच्या पश्चिम किनाऱ्यावर तारकर्ली मालवण्याच्या दक्षिणेस हा समुद्रकिनारा आहे. मुंबईपासून ५४६ किमी अंतरावर हा बीच आहे. येथून तुम्ही नौदल किल्ला पाहू शकता.

India's Best Beaches
Patna History: देवीच्या मंदिरावरुन ठेवण्यात आले पाटणा शहराचे नाव, जाणून घ्या धार्मिक कारण

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com