World Arthritis Day: संधिवात झाल्यास या पदार्थांचे सेवन करणे टाळा; अन्यथा...

Arthritis Treatment: दरवर्षी जगात १२ ऑक्टोबर हा दिवस जागतिक संधिवात दिन म्हणून साजरा केला जातो.
World Arthritis Day
World Arthritis DaySaam Tv
Published On

Arthritis Food :

दरवर्षी जगात १२ ऑक्टोबर हा दिवस जागतिक संधिवात दिन म्हणून साजरा केला जातो. अनेक लोकांना संधिवात आजार असतो. सांधिवातामुळे सांधे दुखणे, सूज येणे असे प्रकार होतात. संधिवात आजाराविषयी जनजागृती व्हावी यासाठी हा दिवस साजरा केला जातो.

संधिवात आजार सर्व वयोगटातील लोकांना होतो. संधिवात आहारासाठी काही औषध नाहीत. त्यामुळे खाण्यापिण्याच्या सवयीत बदल केल्याने आजार नियंत्रणात राहू शकतो. संधिवाताच्या रुग्णांना आजारात पत्थ पाळण्याची गरज असते. त्यामुळे आहारात काही गोष्टी टाळायच्या असतात. आहारात कोणत्या गोष्टी टाळायच्या याविषयी आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत.

World Arthritis Day
Patna History: देवीच्या मंदिरावरुन ठेवण्यात आले पाटणा शहराचे नाव, जाणून घ्या धार्मिक कारण

1. अतिरिक्त साखर

गोड पदार्थ अति प्रमाणात खालल्याने सांधेदुखीचे प्रमाण वाढते. तुम्हाला नेहमी सांधेदुखीचा त्रास होत असेल तर तुमच्या जेवणात साखरेचे अतिप्रमाण टाळावे. चॉक्लेट, सोडा, सर , गोड पेय यामध्ये साखर जास्त प्रमाणात असते. त्यामुळे सांधेदुखीचा त्रास वाढतो.

2. ग्लूटेनयुक्त अन्नपदार्थ

जंक फूड हे खाताना अतिशय चविष्ट लागतात. परंतु आरोग्यासाठी तेवढेच हानिकारक असते. या पदार्थात जास्त प्रमाणात ग्लूटेन असते. त्यामुळे संधिवाताचे प्रमाण वाढते. परिणामी दुखणं आणि सूज वाढते.

3. दारु

जास्त प्रमाणात मद्यपान केल्यास अनेक आजार होऊ शकतात. रोज मद्यपान केल्यास सांधेदुखीचा त्रास वाढू शकतो. ज्या लोकांना सांधिवात आहे त्यांनी दारुचे सेवन केल्यास त्यांना जास्त त्रास होईल.

4. मीठाचे प्रमाण

कोणत्याही पदार्थाचे अतिरिक्त सेवन केल्यास शरीरास हानी पोहचते. जर तुम्ही तुमच्या जेवणात जास्त प्रमाणात मीठ खात असाल तर त्याचा तुम्हाला त्रास होईल. सांधेदुखीच्या रुग्णांनी आहारात जास्त मीठाचा समावेश करु नये.

World Arthritis Day
4k QLED Smart TV: आला सर्वात स्वस्त 75 inch Smart TV, घरबसल्या मिळेल सिनेमा हॉलसारखी मजा; जाणून घ्या किती आहे किंमत

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com