Patna History: देवीच्या मंदिरावरुन ठेवण्यात आले पाटणा शहराचे नाव, जाणून घ्या धार्मिक कारण

Patan Devi Temple: पाटणा शहराचे नाव पडण्यामागे एक पौराणिक कारण आहे.
Patna History
Patna HistorySaam Tv
Published On

Patna Name Story:

भारत देशाला ऐतिहासिक वारसा लाभला आहे. देशातील प्रत्येक शहराला काही न काही न काही इतिहास आहे. असाच इतिहास पाटणा शहराला लाभला आहे. पाटणा या नावालादेखील ऐतिहासिक वारसा आहे. हे नाव असण्यामागची कथा आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

पाटणा ही बिहारची राजधानी आहे. पाटणामध्ये पटण देवी मंदिर आहे. हे मंदिर ५१ शक्तीपीठांपैकी एक आहे. याच मंदिराच्या नावावरुन शहराचे नाव पडले. मिळालेल्या माहितीनुसार, पाटण सुरुवातीला मगध म्हणून ओळखले जायचे. १९१२ मध्ये हे नाव बदलून पाटणा करण्यात आले.

Patna History
Liver Health Tips : सणासुदीच्या काळात गोड आणि तेलाचे पदार्थांमुळे यकृत धोक्यात? जाणून घ्या डॉक्टरांकडून

पाटणा नावामागचा इतिहास

१९१२ मध्ये बिहारच्या राजधानीला काय नाव द्यावे यावर बरीच चर्चा झाली. त्यानंतर पटण देवीचे मंदिराच्या नावावर शहराचे नाव ठेवण्यात आले. हे देवीचे मंदिर पौराणिक काळापासून प्रसिद्ध आहे. हजारो भाविक येथे दर्शनासाठी येतात.

मंदिराची कथा

पौराणिक कथेनुसार, माता सतीचे वडील दक्ष प्रजापती यज्ञ करत होते. या यज्ञादरम्यान राजा दक्ष प्रजापतीने आपली कन्या सतीच्या पतीचा म्हणजे भगवान शिवाचा अपमान केला. त्यामुळे देवी सतीला राग आला. देवी सतीने आगीत उडी मारुन आपले जीवन संपवले. भगवान शिवला ही गोष्ट कळताच त्यांना खूप संताप आला.

रागाच्या भरात महादेवांनी सतीचा मृतदेह हातात घेतला आणि भयंकर तांडव केला. त्यांच्या या तांडवाने संपूर्ण जग हादरले. त्यावेळी भगवान विष्णूंनी चक्र फिरवले. त्यामुळे माता सतीचे ५१ तुकडे झाले अन् ते वेगवेगळ्या ठिकाणी पडले. हे तुकडे जिथे जिथे पडले तिथे शक्तीपीठ बांधण्यात आली. त्यातील एक शक्तीपीठ पाटणा येथे आहे.

पटाण देवीची दोन रुपे आहेत. त्यातील एक छोटी पटण देवी अन् मोठी पटण देवी. हे मंदिर पाटणा शहराचे रक्षण करते असे मानले जाते. नवरात्रीच्या काळात या मंदिरात मोठा उत्सव साजरा केला जातो.

टीप : येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही.

Patna History
Pranjali Awasthi :16 वर्षीय प्रांजलीने सुरु केली AI कंपनी; वर्षभरात कमावते मिलियन्सहून अधिक

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com