Pranjali Awasthi :16 वर्षीय प्रांजलीने सुरु केली AI कंपनी; वर्षभरात कमावते मिलियन्सहून अधिक

AI Company : एआयचा वापर करुन आपण सर्व प्रकारची कामे करु शकतो.
Pranjali Awasthi
Pranjali AwasthiSaam Tv
Published On

Pranjali Awasthi AI Company :

सध्याच्या डिजिटल जगात AI च्या वापरामुळे अनेक कामे सोपी झाली आहे. एआयचा वापर करुन आपण सर्व प्रकारची कामे करु शकतो. लाखो लोक एआयचा वापर करतात. परंतु तुम्हाला माहितीये का? एआयची सुरुवात नक्की कोणी केली? याबद्दल आज जाणून घेऊया.

एआयने अनेकांची कामे सहज आणि सोपी केली आहे. या कंपनीची सुरुवात एका 16 वर्षीय भारतीय मुलीने केली आहे. तिच्या या पाऊलाने सर्वांनाचा आश्चर्यचकित केले आहे. प्रांजली अवस्थीने Delv.AI या कंपनीची सुरुवात केली.

Pranjali Awasthi
Shardiya Navratri 2023 Date: यंदा शारदीय नवरात्रौत्सव ८ की ९ दिवस? महाष्टमी, महानवमी आणि दसरा तिथी कधी? जाणून घ्या

प्रांजलीने मियामी टेक वीक या कार्यक्रमात कंपनीबद्दल माहिती दिली. जानेवारी २०२२ मध्ये प्रांजलीने Delv.AI ही स्टार्टअप कंपनी सुरु केली. 10 लोक या कंपनीत काम करतात. या कंपनीचे मार्केट इव्हॅल्यूशन तब्बल 12 मिलियन डॉलर्सहून अधिक आहे. आतापर्यंत तिला 3.7 कोटी रुपयांचे फंडिग मिळाले आहे. तिचे वडिल इंजिनियर आहेत. तिने तिच्या वडिलांच्या पाऊलावर पाऊल ठेवून ही कंपनी सुरू केल्याचे म्हटले आहे. त्यांच्यामुळेच तिला सायन्स आणि टेक विषयात आवड निर्माण झाली.

7व्या वर्षी कोडिंगला सुरूवात

प्रांजलीला लहानपणापासूनच कोडिंगची आवड होती. वयाच्या ७ व्या वर्षापासूनच तिने कोडिंग करण्यास सुरुवात केली. ११ व्या वर्षी ती फ्लोरिडाला शिफ्ट झाली. तिथे तिला कम्प्युपटर सायन्समध्ये तिला खूप चांगल्या संधी मिळाल्या. 13 वर्षाची असताना तिला फ्लोरिडा इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीमध्ये इंटर्नशिप मिळाली. यानंतर तिने तिची कंपनी उभी केली.

कोरोना काळात मशीन लर्निंगचे शिक्षण

कोरोना काळात ती इंटर्नशिप करताना मशीन लर्निंग शिकली. त्याबरोबर तिने शालेय शिक्षण पूर्ण केले. याच काळात तिने ओपन एआ कंपनीने चॅटजीपीटी बीटा 3 लाँच केले. यातूनच तिने पुढे एआय संकल्पनेवर काम सुरू केले. यानुसार तिने Delv.AI वर काम सुरू केलं.

कंपनी

Delv.AI ही कंपनी ऑनलाईन कंटेटपैकी रिसर्चर्सना विशिष्ट माहीती देण्याचे काम करते. रिसर्चसना योग्य माहिती देणे हेच या कंपनीचे उद्दिष्ट आहे.

Pranjali Awasthi
Famous Temple In Maharashtra: प्राचीन संस्कृतीचा वारसा म्हणून ओळखली जातात ही ५ मंदिरे, जाणून घ्या कुठे आहेत?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com