Bhai Dooj 2025: आजचा दिवस भावंडांच्या प्रेमासाठी समर्पित! भाऊबीज मुहूर्त, पूजा आणि शुभ राशी जाणून घ्या

Bhaiya Dooj rituals: आज गुरुवार २३ ऑक्टोबर २०२५ दिवाळीचा (Diwali) शेवटचा आणि भाऊ-बहिणीच्या पवित्र प्रेमाचा (Sibling Love) उत्सव म्हणजेच भाऊबीज (Bhau Beej) आहे. या पवित्र दिनाला यम द्वितीया असेही म्हणतात.
bhai dooj date
Bhau Beej Celebrationyandex
Published On

आज कार्तिक शुक्ल पक्षातील द्वितीया तिथी असून हा दिवस भाऊबीज म्हणून साजरा केला जातो. भाऊबीज हा स्नेह, प्रेम आणि भावंडांच्या नात्याचा उत्सव आहे. आजच्या दिवशी बहिणी आपल्या भावांना आरती करून दीर्घायुष्य आणि यशासाठी प्रार्थना करतात, तर भाऊ आपल्या बहिणींच्या रक्षणाचं वचन देतात.

भाऊबिजेचा आजचा दिवस शुभ कार्य, कुटुंबीयांसोबत वेळ घालवणं आणि प्रेमभाव वाढवण्यासाठी अत्यंत योग्य आहे. चंद्र आज तुला राशीत आहे आणि विशाखा नक्षत्रात त्यामुळे सौंदर्य, संतुलन आणि आनंददायी घटना घडण्याची शक्यता आहे.

bhai dooj date
Malavya Rajyog: नोव्हेंबरमध्ये शुक्र ग्रह बनवणार मालव्य महापुरुष राजयोग, 'या' राशींचा सुरु होणार गोल्डन टाईम

आजचं पंचांग

  • तिथी: शुक्ल द्वितीया

  • नक्षत्र: विशाखा

  • करण: बालव

  • पक्ष: शुक्ल पक्ष

  • योग: आयुष्मान (५:००:३२ AM, २४ ऑक्टोबरपर्यंत)

  • वार: गुरुवार

  • सूर्योदय: ०६:२०:३८ AM

  • सूर्यास्त: ०५:४२:१३ PM

  • चंद्रोदय: ०७:४८:०३ AM

  • चंद्रास्त: ०६:३५:१४ PM

  • चंद्र राशी: तुला

  • ऋतु: शरद

  • शक संवत: १९४७

  • विक्रम संवत: २०८२

  • माह (अमान्ता/पूर्णिमांत): कार्तिक

अशुभ काळ

  • राहु काल: 01:26:37 PM ते 02:51:49 PM

  • यंमघन्त काल: 06:20:38 AM ते 07:45:50 AM

  • गुलिक काल: 09:11:00 AM ते 10:36:14 AM

शुभ मुहूर्त

  • अभिजीत मुहूर्त: ११:३९:०० AM ते १२:२३:०० PM

  • भाऊबीज पूजा वेळ: सकाळी १०:३० ते दुपारी १२:४५ हा कालावधी सर्वात शुभ मानला जातो.

bhai dooj date
Diwali Padwa: दिवाळीचा आजचा दिवस सोन्यासारखा! पाडव्याच्या मुहूर्तावर या राशींना मिळणार भाग्याची साथ

या राशींना आजच्या दिवशी होणार फायदा

तूळ रास

आज तुमच्यासाठी विशेष भाग्यवर्धक दिवस आहे. चंद्र तुमच्या राशीत असल्याने आनंद, यश आणि कौटुंबिक समाधान वाढणार आहे. भाऊबीज साजरी करताना आनंद होणार आहे.

सिंह रास

आज आत्मविश्वास प्रबळ राहण्याची शक्यता आहे. कुटुंबात आदर वाढणार आहे. भावंडांसोबत वेळ घालवताना समाधान आणि प्रेम वाढण्याची शक्यता आहे. आर्थिकदृष्ट्या दिवस चांगला आहे.

bhai dooj date
दिवाळीला लावण्यात येणाऱ्या फटाक्यांमधून मोठा आवाज का येतो?

मकर रास

आज कामात यश मिळणार आहे. घरात आनंददायी वातावरण राहण्याची शक्यता आहे. बहिणींकडून शुभ आशीर्वाद मिळतील आणि नात्यांमध्ये गोडवा येणार आहे.

bhai dooj date
Bhau Beej 2025: भावाला ओवाळण्यासाठी उद्या कोणता मुहूर्त सर्वोत्तम? आत्ताच नोट करून ठेवा वेळ

मिथुन रास

आज नवे संबंध जुळतील आणि कुटुंबातील वातावरण सुखद राहणार आहे. विशेषतः भावंडांसोबत संवाद आणि सहकार्य वाढण्याची शक्यता आहे. प्रवास आणि नवीन कामांसाठी दिवस अनुकूल आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com