दिवाळीला लावण्यात येणाऱ्या फटाक्यांमधून मोठा आवाज का येतो?

Surabhi Jayashree Jagdish

दिवाळी

फटाक्यांशिवाय दिवाळीची कल्पनाच करता येत नाही. हे फटाके केवळ प्रकाशासाठीच नव्हे तर त्यांच्या आवाजासाठीही प्रसिद्ध आहेत. दिवाळीचा खरा उत्सव या आवाजांनीच पूर्ण होतो.

फटाक्यांचा आवाज

काही फटाके असे असतात जे प्रचंड आवाजासह स्फोट करतात. आता प्रश्न असा आहे की, हे फटाके इतका मोठा आवाज का करतात. यामागे वैज्ञानिक कारण आहे.

आवाज का होतो?

फटाक्यांमध्ये दारूसह पोटॅशियम नायट्रेट (KNO₃), गंधक (Sulfur) आणि कोळशाचं मिश्रण असतं. हे घटक एकत्रितपणे जळल्यावर रासायनिक प्रतिक्रिया देतात. यामुळे उष्णता आणि गॅस तयार होतो.

हे आहे लॉजिक

फटाका पेटवला की त्यातून उष्ण गॅस तयार होतो. ही गॅस झपाट्याने पसरतो आणि त्यामुळे दाब वाढतो. वाढलेला दाब हवेमध्ये ध्वनीतरंग निर्माण करतो जो कानांपर्यंत पोहोचतो.

मोठा आवाज

हे ध्वनीतरंग कानांपर्यंत पोहोचल्यावर ते आपल्याला मोठ्या आवाजासारखा ऐकू येतो. फटाक्यांमध्ये असलेले रसायन गॅस तयार करून स्फोटाचा आवाज निर्माण करतात. त्यामुळेच फटाक्यांचा आवाज इतका तीव्र असतो.

कागदाचं आवरण

फटाक्यांचे मिश्रण कागदाच्या आवरणात भरलेलं असते. जेव्हा हे मिश्रण पेटते तेव्हा त्यातून गॅस बाहेर पडू लागतो. जर गॅसला बाहेर पडण्यासाठी जागा मिळाली नाही तर आतला दाब वाढतो.

मोठा आवाज कसा निर्माण होतो

जेव्हा हा दाब मर्यादेपलीकडे जातो तेव्हा कागदाचं आवरण तुटतं. त्या क्षणाला संपूर्ण दाब एकाच वेळी बाहेर पडतो. आणि तोच दाब स्फोटाच्या आवाजात रूपांतरित होतो.

सर्वाधिक शिकलेला मुघल बादशाह कोण होता?

Mughal emperor | saam tv
येथे क्लिक करा