Snake News : उन्हाळ्यात गावी अंगणात साप येतात? मग या सिंपल टीप्सने सापांना पळवून लावा

How to Keep Snakes Away : त्यांना जागीच मारण्याचा विचार करतात. मात्र काही व्यक्ती सर्पमित्रांना बोलावून सापाला जीवनदान देतात. आता असे करताना साप आपल्याला दंश करण्याची फार भीती असते.
Snake News
Snake NewsSaam TV

Tips to escape from snakes :

साप असं नाव ऐकलं तरी अनेकांच्या काळजात धडकी भरते. रस्त्याने जाताना शेजारी साप दिसला की, सर्वजण तेथून धूम ठोकतात. अशात सध्या उन्हाळा सुरू झाला आहे. उन्हाळ्यात अनेक साप तापमान वाढल्याने जमीनिवर पाण्याच्या शोधात येतात. गावासारख्या ठिकाणी अशा घटना फार घडतात. साप अनेकदा अंगनात फिरताना देखील दिसतो.

Snake News
Summer Food: शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी 'ही' फळे ठरतील गुणकारी

आजवर तुम्ही देखील बऱ्याचवेळा साप आल्याचं पाहिलं असेल. व्यक्ती साप दिसल्यावर त्यांना जागीच मारण्याचा विचार करतात. मात्र काही व्यक्ती सर्पमित्रांना बोलावून सापाला जीवनदान देतात. आता असे करताना साप आपल्याला दंश करण्याची फार भीती असते.

सापाला सर्वचजण घाबरतात मात्र साप कुणाला घाबरतात किंवा कोणत्या गोष्टीपासून साप दूर राहतात हे तुम्हाला माहिती आहे का? विशिष्ट प्रकारचा वास आणि झाडाझुडपांपासून साप नेहमी वेगळे राहतात. आता उन्हळ्यात जर तुमच्याही अंगनात किंवा घराच्या परिसरात साप निघत असतील तर ते येऊ नयेत यासाठी काय करावे याबाबत माहिती जाणून घेऊ.

केरोसीन

साप आपली शिकार नेहमी वासावरून ठरवत असतो. डोळ्यांबरोबरच साप नाकाने वस्तू किंवा अन्य काही गोष्टी ओळखतात. त्यामुळे त्यांना उग्रवास कधीच सहन होत नाही. साप प्रदुषणासह केरोसीन आणि पेट्रोलचा वास येत असलेल्या ठिकाणी थांबत नाही. तेथून ते बाहेर पडतात.

यासह सापांना आणखी कोणता गंध आवडत नाही याबाबत अॅनिमल वेबसाईटवर माहिती देण्यात आली आहे. येथे दिलेल्या महितीनुसार, सापांना पेट्रोल, रॉकेल यासह लसूण आणि कांद्याचा वास देखील सहन होत नाही.

साप घरात किंवा परिसरात असेल आणि त्याला पळवून लावायचे असेल तर अमोनिया गॅसचा देखील उपयोग होतो. याने किंवा कांदा आणि लसूणच्या सहाय्याने तुम्ही सापाला पळवून लावू शकता. सापांची त्वचा अगदी चकचकीत आणि नाजूक देखील असते. त्यामुळे साप दुसऱ्यांवर दंश करताना स्वत:ची देखील काळजी घेतात.

भारतीय मसाले लवंग, दालचिनी, लिंबू, मिरची याच्या वासाने साप नेहमीच तेथून पळ काढतो. त्यामुळे साप दिसल्यावर घरातल्या या सामान्य गोष्टींचा वापर तुम्ही करु शकता. याच्या वासाने साप नक्की पळून जातात.

Snake News
Summer Food : उन्हाळ्यात या पदार्थांचे अतिसेवन ठरु शकते आरोग्याला हानिकारक, वेळीच खाणे टाळा!

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com