Summer Food: शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी 'ही' फळे ठरतील गुणकारी

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

वाढता उन्हाळा

आजकाल उन्हाचा तडाका वाढतांना दिसतोय. त्यामुळे उष्माघाताचे प्रमाण वाढले आहे. प्रचंड वाढलेल्या उष्णतेमुळे डियाड्रेशन किंवा अशक्तपणा जाणवतो.

Rising Summer | Yandex

पाण्याचे सेवन करा

उन्हामुळे योग्य प्रमाणात पाण्याचे सेवन केले पाहिजे. आहारात असे काही फळांचं सेवन करा ज्यामुळे तुमच्या शरीरातील उष्णता कमी होईल.

Consume Water | Yandex

कलिंगड

कलिंगड उन्हाळ्यातील सर्वोत्तम फळ मानले जाते. त्यामध्ये ९० टक्क्यांपेक्षा जास्त पाणी असते. ज्यामुळे शरीरात पाण्याची कमतरता भासत नाही.

watermelon | Yandex

लिंबू

उन्हाळ्यात लिंबू पाण्यामुळे तुमचे शरीर थंड राहते आणि तुम्ही ताजेतवाने राहता. दिवसातून दोनदा हलक्या साखरेसोबतही त्याचे सेवन करू शकता. त्यामुळे वजन कमी होण्यासही मदत होते.

Lemon | Yandex

पुदिना

उन्हाळ्यात शरीराला थंड ठेवण्यासाठी पुदिना हा एक चांगला पदार्थ आहे. तुम्ही दही, ताक किंवा रायतामध्ये पुदिना मिक्स करू शकता. त्यामुळे शरीर थंड राहण्यास मदत होते.

Mint | Yandex

करवंद

करवंद डोंगरची काळी मैना' म्हणून ओळखले जाते. त्यामध्ये मोठ्याप्रमाणात सायट्रिक अॅसिड असल्यामुळे शरीरातील उष्णता वाढत नाही.

Karavand | Yandex

जांभूळ

हे फळ उन्हाळ्यात हमखास खायला मिळतं. या फळात लोह, कॅल्शिअम, फॉस्फरस, 'क' जीवनसत्त्व यांचे प्रमाण अधिक असते. ज्यामुळे शरीराला पोषकत्व मिळते.

Jambhul | Yandex

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.

Disclaimer | yandex

NEXT: चहा सोबत 'या' गोष्टी खाणं टाळा; नाहीतर...

Tea Habits | Yandex