Relationship Tips : सावधान! पार्टनरकडे 'या' गोष्टी सुद्धा मागाव्या लागत असतील, तर हेच आहेत ब्रेकअपचे संकेत

Tips Good Time For a Breakup : दोघांनी एकमेकांच्या भावनांचा आदर केला पाहिजे. मात्र तुमच्या पार्टनरला हे समजत नसेल त्याला हे सांगावं लागत असेल तर आजच नातं संपवा.
Tips Good Time For a Breakup
Relationship TipsSaam TV

प्रत्येक नातं टिकवून ठेवणे हे प्रेयसी आणि प्रियकर या दोघांवर अवलंबून असते. नात्यात विविध करणांमुळे सुखासह दुःख देखील येते. सुखात जसे आपण एकत्र असतो तसेच दुख:त देखील असेल पाहिजे. नातं सावरावं आणि जपावं लागतं. अन्यथा ते कधी तुटून जातं हे आपल्याला सुद्धा समजत नाही. काहीवेळा नात्यात इतके वाद होतात की त्यावेळी आपल्याला थांबावं लागतं आणि नात्याला तिथेच पूर्णविराम द्यावा लागतो.

Tips Good Time For a Breakup
Ahan Shetty Breakup: ११ वर्षांचं रिलेशन तुटलं, अहान शेट्टीचं गर्लफ्रेंड तानिया श्रॉफसोबत ब्रेकअप

वेळ

ज्या व्यक्तीवर आपण प्रेम करतो त्यासाठी आपल्याकडे वेळच वेळ असतो. आपण कितीही कामात असलो तरी रात्री झोपण्यापूर्वी किंवा मग सकाळी दिवसभरातील 5 मिनिटे तरी आपण आपल्या नात्याला वेळ दिली पाहिजेत. मात्र जर तुम्हाला तुमच्या पार्टनरकडून फक्त 5 मिनिटांचा देखील वेळ मिळत नसेल तर हे नातं इथेच थांबवा.

रिस्पेक्ट

प्रत्येक नात्यात एकमेकांविषयी आदर आणि प्रेम असले पाहिजे. काही व्यक्ती आपल्या पार्टनरवर हक्क गाजवण्यासाठी समोरच्या व्यक्तीला न पटणाऱ्या गोष्टी करण्याचा हट्ट करतात. ती कामे न केल्यास माझी रिस्पेक्ट न केल्याचा दावा करतात. दोघांनी एकमेकांच्या भावनांचा आदर केला पाहिजे. मात्र तुमच्या पार्टनरला हे समजत नसेल त्याला हे सांगावं लागत असेल तर आजच नातं संपवा.

कमेटमेंट पूर्ण न करणे

अनेक पार्टनर भावनेच्याभरात आपल्या पार्टनरला विविध कमिटमेंट करतात आणि ऐनवेळी पाठ फिरवतात, दिलेली वाचणे पळत नाहीत. असं करणाऱ्या पार्टनरला आजच राम राम ठोका आणि हे नातं इथेच थांबवा.

लॉयल

सध्या प्रेयसी आणि प्रिकर या दोघांमध्ये विविध कारणामुळे दुरावा येतो. यातलं महत्वाचं कारण म्हणजे दोघात तिसरा येणे. काही व्यक्तींच्या आयुष्यात अचानक दुसरी व्यक्ती येते. अशावेळी आपल्या पार्टनरला आपल्याशी लॉयल रहा असं सांगावं लागत असेल तर आजच हे नातं संपवा.

Tips Good Time For a Breakup
Maldives India Relations : मालदीवच्या नवीन अध्यक्षांनी शपथ घेताच दाखवले रंग, भारतीय सैन्याला मायदेशी परतण्यास सांगितले

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com