Children Gaming Addiction : मुलं Online Gaming च्या आहारी गेलेत, असं सोडवा व्यसन!

Children Mental Health : लॉकडाउनच्या काळापासून सगळ्यांचा स्क्रीन टाइम वाढला. त्यामुळे घरातील लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळेच मोबाईल ,टिव्ही, गेम या गोष्टींमध्ये आपला वेळ घालवत आहे. याचा परिणाम लहान मुलांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर होतो.
Children Mental Health
Children Gaming AddictionSAAM TV
Published On

आजचे युग हे विज्ञानाचे युग आहे. असे कोणतेच क्षेत्र नाही ज्यात विज्ञानाचा वापर होत नाही. विज्ञान आपल्याला लाभलेले एक वरदान आहे. पण असे म्हणतात की, जेवढे विज्ञानाने फायदे दिले आहेत तसेच तोटे सुद्धा दिले आहेत. माणसाची शारीरिक शक्ती कमी होत चालली असून आरोग्याच्या समस्या उद्भवत आहेत.

आता प्रत्येक व्यक्तीकडे स्मार्ट फोन , स्मार्ट वॉच , गेमिंग गैजेट्स अशी डिजिटल उपकरणे पाहायला मिळतात. लहान मुलं दिवसभर ह्याच गोष्टींच्या सोबत असतात आणि त्या नजरेआड गेल्या की त्यांना अस्वस्त वाटते. हल्लीचे पालक आपल्या मुलांना वेळ द्यायला कंटाळा करतात. त्यामुळे त्यांना एखादा गेम खरेदी करून देऊन आपली सुटका करून घेतात. पण यामुळे मुलांच्या मानसिक आरोग्यावर वाईट परिणाम होताना दिसून येतो. गेम्समुळे मुलांच्या विकासामध्ये अडथळे येतात. मुलांना ऑनलाइन गेमिंगचे व्यसन लागते.

ऑनलाइन गेमिंगचे आरोग्यावर परिणाम

गेम्समधील टास्क

गेम्समध्ये मुलांना विविध टास्क दिले जातात. ते पूर्णकरून परत दुसऱ्या पायरीवर जाण्यासाठी नवीन टास्क दिले जातात. यातून तुम्ही विजेते होता. खेळ जिंकल्याचा आनंद अनुभवण्यासाठी हे साधे सोपे वाटणारे खेळ कधी व्यसनाचे रुप घेतात कळत नाही. तुम्हाला खेळात यशाचे आमिष दाखवले जाते. त्यामुळे खेळताना मुलांना रोखल्यावर त्यांची चिडचिड होते.

डिजिटल गोष्टींचे चुकीचे ज्ञान

ऑनलाइन गेमिंगमुळे काही मुलांची बुद्धी एवढी तल्लख होते की, ते डिजिटल गोष्टींमध्ये हुशार होतात. त्यामुळे काही मुलं मोबाईल लॉक आणि पासवर्ड उघडण्यास तयार होतात. पण भविष्यात हीच मुलं वाईट कामांना लागतात.

मानसिक आरोग्यावर वाईट परिणाम

पालकांनी मुलांना गेम्स घेऊन देणे टाळावे. कारण मुलं त्यावर तासनतास खेळत राहतात. ज्याचा त्यांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होताना दिसतो. त्यामुळे पालकांनी मुलांच्या गेम्सवर वेळ मर्यादा ठेवली पाहिजे.

व्यक्तिमत्व विकास खुंटतो

मुलांना हिंसकता आणि आक्रमकता असलेले गेम्स खेळण्यापासून रोखा. कारण याचा मुलांच्या व्यक्तिमत्व विकासावर वाईट परिणाम होताना दिसून येतो.

Children Mental Health
Parenting Tips : मुलांचा दिवसेंदिवस हट्टीपणा वाढतोय? स्वार्थी अन् भावनाशून्य करतात पालकांच्या 'या' गंभीर चुका

मुलांच्या ऑनलाइन गेमिंगवर उपाय

  • मुलांना इनडोर आणि आउटडोर खेळ खेळण्याची सवय लावा.

  • मुलांच्या बुद्धीला चालना देणारे खेळ खेळा.

  • त्यांचे व्यक्तिमत्व सुधारण्यासाठी त्यांना छोटी छोटी आव्हाने द्या.

  • मुलांना ऑनलाइन गेम्स खेळायचे असल्यास त्यांची वेळ मर्यादा घालून ठेवा. तसेच गेम्सचा पासवर्ड पालकांनी स्वतःकडे ठेवा. जेणेकरून परवानगीशिवाय अँपचा वापर होणार नाही.

  • मुलांना जास्तीत जास्त एक तास ऑनलाइन गेम्स खेळायला द्या.

  • गेम खेळण्याची वयोमर्यादा लक्षात घेऊन गेम्स डाउनलोड करा.

  • मुलांना त्यांचे छंद जोपासण्यास प्रोत्साहन करा म्हणजे त्यांचा जास्त वेळ त्या कामात गुंतून राहील.

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Children Mental Health
Milk Side Effects on Children : जास्त प्रमाणात दूध पिणे चिमुकल्यांच्या आरोग्यासाठी घातक; हा गंभीर आजार होण्याची शक्यता

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com