

जेव्हा सेक्सचा विषय येतो. तेव्हा प्रत्येक जण त्यातून आनंद शोधत असतो. सेक्सबद्दल अनेकांचे विचार वेगवेगळे आहेत. पुरुषांची काम भावना महिलांपेक्षा लवकर जागी होते. महिलांमधील सेक्स भावना उशीरा जागी होते. अनेक महिलांची तक्रार असते की आम्हाला पार्टनरकडून ऑर्गेज्म मिळत नाही. पुरुष सहज ऑर्गेज्मची पातळी गाठू शकतात. सेक्समध्ये असे अनेक मार्ग आहेत ज्याद्वारे तुम्ही पार्टनरला संतुष्ट करु शकता. आणि तुमच्या सेक्सलाईफमध्ये आनंद निर्माण करु शकता.
त्यातलाच एक मार्ग म्हणजे 'ओरल सेक्स' (Oral Sex). होय, ओरल सेक्समधून व्यक्तीला सेक्समध्ये अती आनंद मिळवू शकतो. जर एखादा पुरुष आपल्या जोडीदाराला संतुष्ट करू शकत नसेल तर तो ओरल सेक्सद्वारे आपल्या जोडीदाराकडून समाधान मिळवू शकतो. असे अनेक लोक आहेत ज्यांना ओरल सेक्स करताना अस्वस्थ वाटते किंवा त्याची किळस येते. परंतु तज्ञांचं म्हणणं आहे की ओरल सेक्स तुम्हाला सेक्समध्ये उच्चकोटीचा अनुभव देऊ शकतो. ओरल सेक्सबद्दल अशा अनेक गोष्टी आहेत ज्या लोकांना माहित नाहीत. अशा परिस्थितीत, आज आम्ही तुम्हाला ओरल सेक्सबद्दल अशा काही गोष्टी सांगणार आहोत ज्या तुम्हाला कदाचितच माहित नसतील.
अनेक लोकांना असे वाटते की ओरल सेक्समुळे आपले कौमार्य नष्ट होते. पण ते खरे नाही. ओरल सेक्सने तुमचे कौमार्य नष्ट होत नाही. लिंगाचा शारीरिक प्रवेश झाला तरचं तुमचे कौमार्य भंग होऊ शकते. लोकांनी डॉक्टरांच्या सल्ल्याने त्यांच्या मनातील सर्व शंका दूर केल्या पाहिजेत. तथापि, ओरल सेक्समुळे त्यांचे भावनिक कौमार्य हिरावून घेतले जाऊ शकते. त्याच वेळी, बऱ्याच लोकांना असेही वाटते की 'हायमेन' तुटणं म्हणजे कौमार्य गमावणं. पण हे देखील खरे नाही. सायकल चालवणे आणि व्यायाम करणे यासारख्या सक्रिय जीवनशैलीमुळेही हायमेन तुटण्याची शक्यता असते. तथापि, ओरल सेक्स केल्याने 'हायमेन' तुटत नाही.
ओरल सेक्ससाठी महिलांची योनी स्वच्छ असणे देखील तितकेच महत्त्वाचं आहे. जर तुम्ही निट अंघोळ करत असाल तर तुम्ही हायजीन मेंटेन करत आहात, त्यावेळी ओरल सेक्स करायला काही हारकत नाही. परंतु जर महिलेच्या योनीतून उग्र वास येत असेल तर त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे. कारण ते ओरल सेक्समध्ये त्रासदायक असते.
कंडोम 97 टक्के संरक्षण प्रदान करतात. त्यामुळे लोक सेक्स करताना कंडोम वापरतात. लैंगिक संबंधातून पसरणारे आजार टाळण्यासाठी कंडोमचा वापर खूप महत्त्वाचा आहे. बहुतेक ते सेक्स दरम्यान वापरतात, फक्त इतकेच मर्यादित ठेवणे बंधनकारक नाही, तुम्ही ओरल सेक्स करताना देखील वापरू शकता. ओरल सेक्स करताना लैंगिक आजारांचा धोकाही असतो. खास ओरल सेक्ससाठी बनवलेले कंडोमही बाजारात सहज उपलब्ध आहेत, जे तुम्ही ओरल सेक्स करताना वापरू शकता. ते अगदी सुरक्षित आहे.
खरं तर, अशा अनेक स्त्रिया आणि पुरुष आहेत ज्यांना नैसर्गिक सेक्सपेक्षा ओरल सेक्सद्वारे जास्त आनंद मिळतो. हा अनेकदा फोरप्लेचा भाग असतो. तथापि, ते एका चांगल्या आणि अधिक समाधानकारक मार्गाने क्लायमॅक्सकडे नेऊ शकतात. ओरल सेक्स दरम्यान, स्त्रीच्या क्लिटोरिसला उत्तेजन मिळते आणि स्त्रीला उच्चकोटीचा आनंद मिळतो.
Edited By: Pravin Dhamale
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.