दररोज लाखो लोक रेल्वे आणि विमानाने प्रवास (Travel) करतात. रेल्वेचं आणि विमानाचे तिकीट कसे बूक करावे हे सर्वांना माहितीये. परंतु तिकीट रद्द केल्यानंतर आपल्याला पैसे परत मिळतात का? रेल्वे आणि विमान कंपन्यांकडून पैसे मिळवण्यासाठी काय करावे लागते याची माहिती बहुतेकांना नसते. तिकीटाचे पैसे परत मिळवण्यासाठी अनेक अटी आणि नियम आहेत. हे सर्व आपण एक एक करून पाहू या.(Latest News)
फ्लाइट रद्द झाल्यास?
डायरेक्टर जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन (DGCA) च्या म्हणण्यानुसार, कोणत्याही कारणास्तव फ्लाइट रद्द झाल्यास, एअरलाइनला तुम्हाला दोन पर्याय द्यावे लागतील. एकतर ते तुमच्यासाठी दुसऱ्या फ्लाइटची व्यवस्था करावे लागेल किंवा तुमचे संपूर्ण पैसे परत करावे लागतील.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
तुम्ही तिकीट रद्द केलं तर काय होईल?
तुम्ही तिकीट रद्द केल्यानंतर रिफंडचे नियम बदलतात. फ्लाइट सुटल्याच्या ३ दिवसांच्या आत तुम्ही तुमचे तिकीट रद्द केले तर तुम्हाला ३५०० रुपये किंवा विमानाचे भाडे भरावे लागेल. जर तुम्ही तिकीट ३ दिवस आधी रद्द केलं तर ३००० रुपये शुल्क कापले जातील. सात दिवसाअगोदर तिकीट रद्द केले तर संपूर्ण रक्कम परत केली जाते. वाचकांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा हे सर्व अटी देशांतर्गत उड्डाणांना लागू असतील.
एअरलाइनने डाउनग्रेड किंवा रद्द केल्यास?
डीजीसीएच्या (DGCA) नियमांनुसार, जर एखाद्या विमान कंपनीने प्रवाशाचे तिकीट डाउनग्रेड केले. किंवा प्रवाशाला (Traveler) न कळवता ते रद्द केले किंवा बोर्डिंग नाकारले, तर प्रवाशाला तिकिटाच्या रकमेच्या ३० ते ७५ टक्के रक्कम परत करावी लागेल. आंतरराष्ट्रीय प्रवाशांना किमीनुसार ३० टक्के ते ७५ टक्के रिफंड आणि कर भरावा लागेल.
रेल्वे चार्ट तयार होण्यापूर्वीचे नियम
जर रेल्वे चार्ट तयार होण्याआधी म्हणजेच ४८ तासांच्या आधी जर तुम्ही रेल्वेचं तिकीट रद्द केलं तर फर्स्ट/एक्झिक्युटिव्ह क्लाससाठी २४० रुपये, एसी २ टियर/फर्स्ट क्लाससाठी २०० रुपये, एसी ३ टायर/एसी चेअर कार/एसी ३ इकॉनॉमीसाठी १८० रुपये, स्लीपरसाठी १२० रुपये आणि सेकंड क्लाससाठी ८० रुपये रद्द शुल्क आकारले जाते. त्याच जागी जर तुम्ही रेल्वे सुटण्याच्या १२ तास आधी तिकीट (ticket) रद्द केले तर तिकीट रद्द करण्याचे शुल्क आकारले जाईल.
तुमच्या तिकीटाच्या शुल्काच्या २५ टक्के भाग या शुल्कात कट केला जाईल. जर कोणत्याही कारणास्तव तुम्ही तुमचे रेल्वे तिकीट १२ तासांपेक्षा कमी आणि ४ तासांपूर्वी रद्द केले तर तिकीटा दरातील ५० टक्के शुल्क कापले जाईल.
तत्काळ तिकिटांबाबत रेल्वेचे नियम
तुम्ही तुमचे कन्फर्म केलेले तत्काळ तिकीट रद्द केल्यास तुम्हाला रिफंड मिळणार नाही. जर तत्काळ तिकीट प्रतीक्षा यादीत असेल तर त्यावर काही शुल्क कापले जात नाही. तात्काळ तिकीट काढल्यानंतर जर तिकीट आरएसी किंवा वेटिंग लिस्टमध्ये असेल आणि तुम्ही ट्रेन सुटण्याच्या वेळेच्या ३० मिनिटे आधी तिकीट रद्द केलं तर स्लीपर क्लाससाठी ६० रुपये.
एसीचं तिकीट असेल तर तुमच्या तिकीट दरातील ६५ टक्के रक्कम कपात केली जाईल. जर तिकीट कन्फर्म झाले असेल तर तिकीट रद्द करताना तुम्हाला विशेष काळजी घ्यावी लागेल. ट्रेन सुटण्याच्या वेळेच्या ४ तास आधी तिकीट रद्द केले नाही तर रिफंड मिळणार नाही.
ई-तिकीट आणि काउंटर तिकिटांसाठी रिफंड नियम काय?
IRCTC नुसार, तुम्ही ऑनलाइन बुक केलेली ई-तिकीट रद्द करू शकता. हे तिकीट रद्द केल्यास त्याचे शुल्क वजा करून उर्वरित रक्कम तुमच्या बँक खात्यात येईल. पीआरएस काउंटरवर जाऊन तिकीट रद्द केल्यास तेथेही तुम्हाला रिफंड मिळेल.
ग्रुप किंवा कुटुंबाचे तिकीट असेल तर?
जर तुमच्याकडे कुटुंब किंवा ग्रुपचे ई-तिकीट असेल आणि त्यात काही जागा निश्चित झाल्या असतील आणि बाकीच्या सीट हे प्रतीक्षा यादीत किंवा आरएसीमध्ये असतील. तर आपण सहसा प्रवास करणं टाळत असतो. कारण आपल्याला सर्वांसोबत प्रवास करायचा असतो. मग जर तुम्हाला प्रवास करायचा नसेल, तर तुम्हाला कन्फर्म तिकिटांचा रिफंड मिळेल.
ट्रेन रद्द झाली तर?
जर तुम्ही रेल्वेचं ई-तिकीट घेतलं असेल आणि तुमची रेल्वे गाडी रद्द झाली तर तिकीटाची संपूर्ण रक्कम तुमच्या खात्यात जमा केली जाते. तुमच्याकडे काउंटरचे तिकीट असेल तर तुम्ही PRS काउंटरवरून तुमचा रिफंड मिळवू शकता. यासाठी ट्रेन निघण्याच्या नियोजित वेळेच्या ७२ तासांच्या आत कोणत्याही काउंटरवरून तिकीट रद्द करणे आवश्यक आहे.
ट्रेन ३ तासांहून अधिक उशिराने आली तर
ट्रेन तुमच्या बोर्डिंग स्टेशनवर नियोजित वेळेपेक्षा ३ तास किंवा जास्त उशिरा आल्यास तुम्हाला तुमच्या ई-तिकीटाचे संपूर्ण रिफंड मिळेल. परंतु पूर्ण रिफंड मिळण्यासाठी ट्रेनच्या सुटण्याच्या वेळेपूर्वी TDR ऑनलाइन दाखल करावे लागेल. जर तुम्ही तिकीट काउंटवरून तिकीट घेतलं असेल तर तुम्ही ज्या स्थानकावरून प्रवास सुरू करणार आहात तेथील रेल्वे अधिकाऱ्यांना तिकीट देऊ शकतात. तिकीट दिल्यानंतर तुम्ही त्या काउंटरवरून पूर्ण रिफंड मिळवू शकतात.
रेल्वे गाडीने मार्ग बदलला तर
जर तुमची ट्रेनने तिचा मार्ग वळवला असेल आणि तुम्हाला प्रवास करायचा नसेल, तर तुम्हाला प्रवास भाडे पूर्ण रिफंड केले जाते. यासाठी तुम्हाला स्टेशनवर जाऊन ट्रेन सुटण्याच्या ७२ तासांच्या आत टीडीआर फाइल करावा लागेल.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.