Skin Care Tips : या 5 चुकीच्या सवयींमुळे त्वचा होतेय निस्तेज, कशी घ्याल काळजी

Skin Glowing : आपण सनस्क्रीन लावून देखील त्वचेची योग्य प्रमाणात काळजी घेत नसू तर त्वचेचे तेज कमी होते.
Skin Care Tips
Skin Care TipsSaam Tv
Published On: 

Bad Habits For Skin : उन्हाळा सुरु झाला की, सूर्याच्या किरणांमुळे आपल्या त्वचेला अधिक हानी पोहोचते. पण जर आपण सनस्क्रीन लावून देखील त्वचेची योग्य प्रमाणात काळजी घेत नसू तर त्वचेचे तेज कमी होते.

आपल्यापैकी अनेकांची चमकदार त्वचा (Skin) असण्याची इच्छा असते, परंतु अनेक वेळा लोक आपल्या त्वचेची योग्य काळजी घेत नाहीत. त्यामुळे त्वचेच्या समस्यांना सामोरे जावे लागते. निरोगी त्वचेसाठी तुम्ही अनेक प्रकारची महागडी उत्पादने वापरता, पण त्यामुळे त्वचेला फायद्याऐवजी नुकसान होते. जर तुम्हाला नैसर्गिकरित्या चमकणारी त्वचा हवी असेल तर तुम्हाला वाईट सवयींपासून (Habits) दूर राहावे लागेल. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला अशा सवयींबद्दल सांगणार आहोत ज्या तुमच्या त्वचेला हानी पोहोचवतात. जाणून घेऊया त्याबद्दल

Skin Care Tips
Best Moisturizer For Oily Skin: उन्हाळ्यात तेलकट त्वचेसाठी कोणत्या प्रकारचा मॉश्चरायझर ठरेल बेस्ट ! कशी घ्याल त्वचेची काळजी

1. झोपण्यापूर्वी चेहरा न धुणे

जर तुम्ही मेकअप केला असेल आणि तो न काढता तुम्ही झोपी गेलात तर त्यामुळे त्वचेच्या अनेक समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे झोपण्यापूर्वी आपला चेहरा (Face) नियमितपणे धुवा. यामुळे तुमची त्वचा स्वच्छ आणि निरोगी राहील.

2. एकच उशी वापरणे

एकच उशीचा वापर अधिक काळ करणे. तसेच त्याचे कव्हर देखील न धुणे अशामुळे चेहऱ्यावर घाण जमा होऊ शकते. अशावेळी उशीचे कव्हर वेळोवेळी बदलत राहा.

Skin Care Tips
Rice Flour Benefits For Skin : तांदळाच्या पीठाने चेहरा करा ग्लो; फॉलो करा या स्टेप्स, त्वचा दिसेल अधिक सुंदर

3. सनस्क्रीनचा वापर न करणे

जर तुम्ही सनस्क्रीन न लावता कडक उन्हात बाहेर पडलात तर त्यामुळे तुमच्या त्वचेचे नुकसान होते. त्यामुळे वृध्दत्वाची चिन्हे जसे बारीक रेषा लवकर दिसू लागतात. ही समस्या टाळण्यासाठी सनस्क्रीन लावणे आवश्यक आहे. हे सूर्याच्या हानिकारक अतिनील किरणांपासून आपले संरक्षण करते.

Skin Care Tips
Kirthi Shetty : तुझ्या डोळ्यांची कमान, तितं ववाळीन प्राण...

4. पाणी कमी प्या

पाणी शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकते आणि त्वचेला आर्द्रता देते. जर तुम्हाला निरोगी त्वचा हवी असेल तर पुरेसे पाणी नियमित प्या. कमी पाणी प्यायल्याने त्वचेची चमक कमी होऊ शकते.

5. झोप पूर्ण न होणे

जर तुम्हाला नीट झोप येत नसेल तर त्याचा परिणाम त्वचेवर होतो. निरोगी त्वचेसाठी दररोज 7-8 तासांची झोप घेणे आवश्यक आहे.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com