Colon cancer: त्वचेवर दिसणारे हे संकेत दर्शवतात कॅन्सरचा धोका, वेळीच ओळखा चेहऱ्यावर दिसणारे बदल

skin signs cancer risk: आरोग्यतज्ज्ञांच्या मते, त्वचेवरील काही बदल हे कोलोन कर्करोगाचे सुरुवातीचे संकेत असू शकतात. विशेषतः चेहऱ्यावर दिसणारे बदल वेळेत ओळखले नाहीत तर धोका वाढू शकतो.
skin signs cancer risk
skin signs cancer risksaam tv
Published On

कोलन कॅन्सर म्हणजेच कोलोरेक्टल कॅन्सर हा जगभरात वेगाने वाढणाऱ्या कॅन्सरपैकी एक मानला जातो. साधारणपणे लोकं पोटदुखी, मलविसर्जनाच्या सवयींमध्ये बदल किंवा शौचात रक्त येणं अशा समस्यांकडे पाहतात. मात्र तज्ज्ञ सांगतात की, अनेकदा कोलोन कॅन्सरची लक्षणं तुमच्या त्वचेवरही दिसून येतात.

जर त्वचेवर लालसरपणा, गाठी, रंग बदलणं किंवा न भरून येणाऱ्या जखमा दिसल्या तर त्याकडे दुर्लक्ष करणं धोकादायक ठरू शकतं. चला पाहूया त्वचेवर दिसणारे कोणते बदल कोलन कॅन्सरकडे इशारा करतात आणि त्यांना दुर्लक्षित करणं किती गंभीर ठरू शकतं.

skin signs cancer risk
Indigestion problems: थंडीच्या दिवसात होतेय अपचनाची समस्या? स्वयंपाक घरात असलेला हा मसाला करेल त्रास दूर

त्वचेवर कोलन कॅन्सरचा परिणाम

त्वचा अनेकदा शरीरात कोणत्या समस्या सुरु आहेत हे दर्शवतं. कोलन कॅन्सरमध्ये त्वचेवर बदल अनेक कारणांनी होऊ शकतात. जसं की, कॅन्सर पेशींचा प्रसार, शरीराची प्रतिकारशक्तीची प्रतिक्रिया किंवा कॅन्सर उपचारांचा परिणाम. हे बदल शरीराच्या धडावर, हातांवर किंवा पायांवर दिसू शकतात. यामध्ये त्वचा हलकी लालसर होणं तर कधी कठीण गाठ किंवा उघडी जखम याप्रमाणे दिसतात.

तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, ज्या व्यक्तींच्या कुटुंबात कोलन कॅन्सरचा इतिहास आहे किंवा जीवनशैलीशी संबंधित धोके आहेत त्यांनी या संकेतांकडे विशेष लक्ष दिलं पाहिजे. वेळेवर लक्षणं ओळखल्यास उपचार सोपे होण्यास मदत होते.

skin signs cancer risk
Silent heart attack risk: सायलेंट हार्ट अटॅकपूर्वी शरीरात होतात हे बदल; कोणाला असतो जास्त धोका, जाणून घ्या

कोलन कॅन्सरची त्वचेवर दिसून येणारी लक्षणं

कटेनियस नोड्यूल्स

अनेकदा कोलन कॅन्सरच्या पेशी त्वचेवर पसरून कठीण गाठी निर्माण करतात. या गाठी आकाराने वेगवेगळ्या असू शकतात आणि कधी कधी वेदनादायकही ठरतात. कॅन्सर मूळ जागेपासून पुढे पसरत असल्याचा हा संकेत आहे.

एरिथेमा आणि इन्फ्लेमेटरी रॅशेस

एरिथेमा म्हणजे त्वचेवर लालसरपणा आणि सूज. कोलन कॅन्सर असल्यास शरीराच्या इम्यून प्रतिक्रियेमुळे असं लक्षणं दिसून येऊ शकतं. हे पॅच सामान्य रॅशसारखे दिसले तरी ते दीर्घकाळ टिकतात.

skin signs cancer risk
Silent heart attack symptoms: सायलेंट हार्ट अटॅक येण्यापूर्वी शरीरात होतात 'हे' मोठे बदल; संकेत लक्षात येणं फारच कठीण

हायपरपिगमेंटेशन आणि डिस्कलरेशन

काही वेळा त्वचेचा रंग गडद होतो. हे शरीरातील मेटाबॉलिक बदल किंवा कॅन्सर उपचारांचा परिणाम असू शकतो. हे बदल हळूहळू हात किंवा चेहऱ्यावर दिसू लागतात.

skin signs cancer risk
Heart Attack: ही 4 ‘साइलेंट’ लक्षणं दिसली तर तत्काळ सावध व्हा; हार्ट अटॅकची सुरूवात असू शकते

डिस्क्लेमर : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांना देत आहोत. आम्ही याचं समर्थन अथवा दावा करत नाही. कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानंच घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com