Diabetes skin symptoms: त्वचेवर दिसतात ही ७ लक्षणं, लगेच व्हा सावध, कधीही कंट्रोल न होणारा डायबेटिस होण्याचा धोका

Skin changes and diabetes risk: मधुमेह हा आजार हळूहळू शरीरावर परिणाम करतो. सुरुवातीला अनेकदा त्याची लक्षणे दुर्लक्षित केली जातात. परंतु त्वचेवर दिसणारी काही चिन्हे ही मधुमेहाची सुरुवात दर्शवू शकतात.
Diabetes skin symptoms
Diabetes skin symptomsSAAM TV
Published On

चुकीची जीवनशैली आणि अयोग्य आहार यामुळे अनेक आजारांमध्ये वाढ होताना दिसतेय. यातीलच एक आजार म्हणजे मधुमेह. मधुमेहाचा परिणाम केवळ व्यक्तीच्या दैनंदिन जीवनावर होत नाही तर भविष्यातही अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. मधुमेहाच्या रूग्णांना रक्तातील साखर वाढली की त्वचेवर काही लक्षणं दिसून येतात. ही लक्षणं नेमकी कोणती आहेत ते पाहूयात.

पायांवर डाग दिसणं

मधुमेह असलेल्या लोकांच्या पायावर डाग दिसून येतात. याला स्पॉटेड लेग सिंड्रोम असंही म्हणतात. हे डाग गोल असून त्यांचा रंग तपकिरी किंवा लालसर तपकिरी रंगाचे दिसतात. हे डाग दिसल्यास रक्तातील साखरेची तपासणी करणं आवश्यक आहे.

त्वचा जाडसर होणं

Frontiers च्या माहितीनुसार, जर बरेच दिवस ब्लड शुगर जास्त राहिली तर कोलेजनची साठवण होते. यामुळे त्वचा जाडसर होऊ लागते. वैद्यकीय भाषेत या अवस्थेला Scleredema Diabeticorum म्हणतात. ही समस्या प्रामुख्याने वरच्या पाठीवर, खांद्यांवर किंवा मानेवर पाहायला मिळते.

जखमं किंवा व्रण

मधुमेहामुळे शरीरावर जर एखादी जखम झाली असेल तर ती लगेच भरून येत नाही. ब्लड शुगर जास्त राहिल्यास रक्ताभिसरण कमी होतं आणि नर्वचं नुकसान होतं. परिणामी तुमच्या पायांवर असलेल्या जखमा भरून येत नाहीत. अशा जखमांना Diabetic Ulcers म्हणतात.

लहान गाठी दिसणं

त्वचेवर अचानक लहान गाठी येणं हा देखील मधुमेहाचा एक इशारा असू शकतो. अनियंत्रित मधुमेहामुळे रक्तात Triglycerides नावाच्या चरबीचं प्रमाण खूप वाढतं. सुरुवातीला गाठी दिसतात आणि नंतर त्या पिवळसर रंगाच्या होतात. या गाठी मांडी, गुडघं किंवा कोपरावर जास्त दिसतात.

Diabetes skin symptoms
Belly Fat: बेली फॅट कमी करण्यासाठी पाणी किती प्यावे? जाणून घ्या योग्य प्रमाण

त्वचेवर काळसर डाग

मानेला, काखेत किंवा जांघेच्या भागात काळसर डाग दिसणं हे मधुमेह किंवा प्रीडायबेटीसचं लक्षण असू शकते. या अवस्थेला Acanthosis Nigricans म्हणतात. NIH च्या माहितीनुसार, ही अवस्था क्वचितच गंभीर आजाराचं लक्षण असते.

डोळ्यांच्या पापण्यांवर पिवळसर डाग किंवा गाठी

American Academy of Dermatology च्या माहितीनुसार, डोळ्यांच्या पापण्यांवर किंवा आजूबाजूला पिवळसर डाग किंवा गाठी दिसू शकतात. हे रक्तातील चरबीचं प्रमाण जास्त झाल्यामुळे येतात. वैद्यकीय भाषेत यांना Xanthelasma म्हणतात.

Diabetes skin symptoms
Limbu Pani: उन्हाळ्यात लिंबूपाणी किती प्यावे? जाणून घ्या योग्य प्रमाण आणि त्यामागील कारणे

त्वचेवर चामखीळ येणं

अनेकांना त्वचेवर चामखीळ दिसून येतात. पण यांचं प्रमाण जास्त दिसल्यास सावध व्हा. विशेषतः डोळ्यांच्या पापण्यांवर, मानेला किंवा जांघेच्या भागात टाइप २ मधुमेहाचे संकेत असू शकतात. वैद्यकीय भाषेत यांना Acrochordons म्हणतात.

Diabetes skin symptoms
Drinking Water According to Age: वयोमानानुसार तुम्ही किती प्रमाणात पाणी प्यायलं पाहिजे? पाहा संपूर्ण चार्ट

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com