ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
उन्हाळ्यात शरीरातील पाण्याची कमतरता भरून काढण्यासाठी लिंबूपाणी उपयुक्त ठरते. किती प्यावे याची योग्य माहिती आज आपण जाणून घेणार आहोत.
लिंबूपाणी अनेक पोषक तत्वांनी भरलेले असते – ज्यात व्हिटॅमिन C, B6, ई, कॅल्शियम, पोटॅशियम, लोह, फोलेट, प्रथिने आणि इतर घटक असतात.
उन्हाळ्यात शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी दिवसातून दोनदा लिंबाचा रस पाण्यात मिसळून प्यावा, पण त्याहून जास्त टाळणेच आरोग्यास हितावह आहे.
उन्हाळ्यात शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी दिवसातून दोनदा लिंबाचा रस पाण्यात मिसळून प्यावा, पण त्याहून जास्त टाळणेच आरोग्यास हितावह आहे.
किडनी स्टोन असणाऱ्यांनी अधिक लिंबूपाणी टाळावे, कारण त्यातील सायट्रेटमुळे स्टोन वाढू शकतो आणि त्रास अधिक होण्याची शक्यता असते.
लिंबूपाणी अति प्रमाणात घेतल्यास त्यातील आम्लामुळे हाडांची मजबुती कमी होऊ शकते, त्यामुळे ते मर्यादित प्रमाणातच सेवन करावे.
लिंबूपाण्यातील अधिक पोटॅशियममुळे अति सेवन केल्यास छातीत जळजळीसारखी समस्या निर्माण होऊ शकते, म्हणून मर्यादित प्रमाणातच पिणे फायदेशीर आहे.
उन्हाळ्यात दिवसातून दोन लिंबांचा रस पाण्यात घेणे योग्य मानले जाते. ही माहिती केवळ प्रेक्षकांपर्यंत पोहचवत असून, आम्ही कोणताही वैद्यकीय दावा करत नाही.