How to hydrate your body : बदलेल्या ऋतूमानानुसार वातावरणात अनेक बदल होताना दिसत आहे. पहाटेच्या वेळी थंडी वाढते तर दुपारच्या वेळी अचानक गर्मी वाढते. त्यामुळे अनेकांना आरोग्याच्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे.
वाढत्या उन्हामुळे शरीराला हायड्रेट ठेवण्याची गरजही भासू लागली आहे. उन्हाळ्याच्या हंगामात, आपण आपल्या शरीरात पाणी कमी होऊ देऊ नये हे खूप महत्वाचे आहे, अन्यथा आपल्याला अनेक आरोग्य समस्यांना सामोरे जावे लागू शकते.
उन्हाळ्यात तुम्ही तुमच्या खाण्याच्या सवयी बदलून स्वतःला सहज निरोगी आणि तंदुरुस्त ठेवू शकता. टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, अशा 7 पदार्थांबद्दल जाणून घेऊया जे निरोगी राहण्यास मदत करतील.
1. सफरचंद-
2. टोमॅटो -
टोमॅटोचा (Tomato) वापर जवळपास सर्व घरांमध्ये भाजी आणि कोशिंबीर म्हणून केला जातो, परंतु तुम्हाला माहित आहे का की टोमॅटोमध्ये 94 टक्के पाणी असते आणि ते शरीराला डिहायड्रेशनपासून वाचवण्यास खूप मदत करते. टोमॅटोमध्ये व्हिटॅमिन ए मुबलक प्रमाणात असते. त्याच्या सेवनाने दृष्टी कमी होणे, उच्च रक्तदाबाचा धोका कमी होतो आणि त्वचेचे एकूण आरोग्य सुधारते.
3. काकडी -
उन्हाळ्यात सलाड म्हणून काकडीचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो कारण ती शरीरातील पाण्याची कमतरता दूर करण्यासाठी खूप उपयुक्त आहे. काकडीत ९५ टक्के पाणी असते. एवढेच नाही तर यामध्ये पोटॅशियम देखील असते. काकडी खाल्ल्याने उष्माघाताचा धोकाही कमी होतो. मेंदूच्या आरोग्यासाठीही (Health) काकडी खाणे फायदेशीर ठरू शकते.
4. टरबूज -
उन्हाळा येताच बाजारात टरबूज दिसू लागतात. टरबूज स्वादिष्ट तसेच आरोग्यदायी आहे. त्यात ९२ टक्के पाणी असते आणि ते उष्माघातापासून बचाव करण्यास मदत करते. यामध्ये इतर पोषक घटक देखील असतात जे रोगप्रतिकारक शक्ती सुधारण्यास मदत करतात.
5. मशरूम -
शरीराला हायड्रेट ठेवणाऱ्या पदार्थांमध्ये मशरूमचे नाव ऐकून तुम्हाला धक्का बसेल, पण ते खाल्ल्याने शरीरातील पाण्याची कमतरता पूर्ण होते. मशरूम व्हिटॅमिन बी 2 आणि डीचा देखील चांगला स्रोत आहे. त्यात ९२ टक्के पाणी असते. जर तुम्ही नियमित मशरूम खाल्ले तर ते थकवा कमी करण्यास देखील मदत करते.
6. स्ट्रॉबेरी -
हे छोटे लाल रंगाचे फळ चवीसोबतच पौष्टिकतेच्या बाबतीतही कुणापेक्षा कमी नाही. स्ट्रॉबेरीमध्ये ९१ टक्के पाणी असते. यामध्ये भरपूर प्रमाणात अँटी-ऑक्सिडेंट, व्हिटॅमिन सी, मॅंगनीज आणि फोलेट असते. ही सर्व पोषकतत्त्वे मधुमेह, कर्करोग आणि हृदयाशी संबंधित काही गंभीर आजारांमध्ये खूप फायदेशीर आहेत.
7. ब्रोकोली -
ब्रोकोली ही परदेशी भाजी आपल्या देशातही खूप लोकप्रिय झाली आहे. शरीरातील पाण्याची कमतरता भरून काढण्यासाठी ब्रोकोली खूप मदत करते. त्यात ९० टक्के पाणी असते. यासोबतच व्हिटॅमिन ए, के, कॅल्शियम, फॉलिक अॅसिड आणि आयनसारखे अनेक पोषक घटकही ब्रोकोलीमध्ये आढळतात.
डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.