Senior Citizen Scheme : वृध्दापकाळात आर्थिक चिंता सतावणार नाहीच! या तीन सरकारी योजनेमुळे आयुष्य सुरळीत होईल

Government Schemes : वयाच्या ६० वर्षांनंतर सरकारी आणि बँकेच्या योजना तुम्हाला नक्की मदत करेल.
Senior Citizen Scheme
Senior Citizen SchemeSaam Tv
Published On

Government Scheme For Senior Citizen

प्रत्येकाला आपल्या भविष्याची चिंता सतावत असते. वय जसे जसे वाढत जाते तसतशी आर्थिक चिंता सतावते. जर तुम्हीही वयाची साठी ओलांडली असेल तर या सरकारी आणि बँकेच्या योजना तुम्हाला नक्की मदत करेल. या योजनेत गुंतवणूक केल्याने तुम्हाला खूप फायदा होईल.

वयाच्या ६० वर्षानंतर सर्वजण उत्पन्नासाठी वेगवेगळे मार्ग शोधत असतात. त्यासाठी सरकारच्या या योजना तुम्हाला मदत करतील. यामुळे तुमच्याकडे नियमित व्याजाच्या रुपात चांगली रक्कम मिळेल. तर याचबरोबर टॅक्समध्येही सुट मिळेल. अशाच ३ योजनांबद्दल आज आम्ही तुम्हाला माहीती देणार आहोत.

Senior Citizen Scheme
2000 Rs Notes Exchange: २००० नोट बदलायला बँकेत जाताय?; या गोष्टींची घ्या काळजी

ज्येष्ठ नागरिक बचत योजना

६० वर्षांवरील नागरिक ज्येष्ठ नागरिक बचत योजनेत (SCSS)मध्ये गुंतवणूक करु शकतात. या योजनेत तुम्हाला तिमाही स्वरुपात व्याज मिळेल. हे पैसे तुम्हाला ५ वर्षांच्या लॉक इन काळनंतरच मिळतात. या योजनेत सुरुवातीला किमान १००० रुपयांपासून गुंतवणूक करु शकता. याशिवाय या योजनेत कलम ८० सी अंतर्गत सूटही मिळेल.

पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजना

पोस्ट ऑफिस मासिक उतपन्न योजना (POMIS)ही एक लहान योजना आहे. ही योजना ज्येष्ठ नागरिकांसाठी अत्यंत उपयुक्त ठरेल. ज्यामध्ये तुम्ही ५ वर्षांसाठी गुंतवणूक करु शकतात. या खात्यात तुम्ही जास्तीत जास्त ९ लाख रुपयांची गुंतवणूक करु शकता तर संयुक्त खात्यात १५ लाख रुपये गुंतवू शकता. या योजनेतच तुम्हाला मासिक आधारावर व्याज मिळते.

Senior Citizen Scheme
Coconut Water Increase Platelets : डेंग्यूमुळे शरीरातील पेशी कमी झाल्या आहेत? नारळपाणी प्यायल्याने फायदा होईल का? तज्ज्ञांचे मत

मुदत ठेव(FD)

ज्येष्ठ नागरिक ग्राहकांना गुंतवणूक करुन ठरावीक काळानंतर परतावा मिळवायचा असेल तर मुदत ठेव (FD)हा एक चांगला पर्याय आहे. एफडी करताना बहुतेक बँका ज्येष्ठ नागरिकांना सामान्य व्याजदरांव्यतिरिक्त ०.५० टक्के अतिरिक्त व्याज देतात. तुम्हाला या योजनेत व्याजाची रक्कम मासिक, त्रैमासिक, सहामाही आणि वार्षिक आधारावर मिळते.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com