भारतात २००० रुपयांच्या नोट बंद करण्यात आल्या आहेत. जर कोणाकडे २००० रुपयांच्या नोटा असेल तर त्या लवकरात लवकर बदलू घ्यायच्या सूचना आरबीआयने दिले आहेत. जर तुम्ही या नोटा बदलायला बँकेत जाणार असाल तर या गोष्टींचा काळजी घ्या.
२००० च्या नोटा बदलून घेण्यासाठी ३० सप्टेंबर २०२३ पर्यंतची मुदत आहे. या नोटा तुम्ही बँकेत डिपॉझिट करु शकता. या नोटा तुम्ही बँका किंवा आरबीआयच्या ऑफिसमध्ये जाऊन बदलू शकता. या नोटा बदलण्यासाठीची प्रोसेस ही वेगळी आहे. त्यामुळे या नोटा बदलताना ही काळजी घ्या. २००० नोटा बदलण्यासाठी आरबीआयने बँकाचा काही सूचना दिल्या आहेत. तुम्ही या गोष्टींचे पालन करुनच नोट बदलून घेऊ शकता.
सावध राहा
तुम्ही २००० च्या नोटा बदलायला बँकेत किंवा पोस्ट ऑफिसमध्ये जाता तेव्हा तुम्हाला ओळख पत्राची गरज असते. ओळखपत्राशिवाय तुमची कामे होणार नाही. तुमच्या ओळखपत्राचा कोणीही गैरफायदा घेऊ नये याची खात्री करा. त्यामुळे नोट बदलताना या सर्व गोष्टींची काळजी घ्या.
नोट बदली करताना नेहमी आपले ओळखपत्र स्वतः जवळ ठेवा. यात आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, वोटर आय-डी, पासपोर्ट, पॅन कार्ड किंवा सरकारमान्य कोणतेही कागदपत्र दाखवू शकता. या ओळखपत्राची नेहमी फोटोकॉपी द्यावी. ओरिजनल कागदपत्रे तुमच्याजवळ ठेवा.
पावती
जर तुम्ही बँकेत जाऊन नोट बदली करत असाल तर त्याची पावती घेणे आवश्यक असते. भविष्यात ही पावती तुमच्या कामी येऊ शकते.
नोट बदली करण्यावर मर्यादा
मध्यवर्ती बँकानी नोट बदली करताना काही लिमिट निश्चित केली आहे. या लिमिटनुसार तुम्ही नोट बदलू शकता. आरबीआयने यासाठी काही नियम आणि सूचना दिल्या आहेत. यानुसार, जर कोणती व्यक्ती ५० हजारांपेक्षा जास्त पैसे डिपॉझिट करत असेन तर त्यासाठी पॅन कार्डची डिटेल्स दाखवावी लागेल.
बँकेत जाऊन नोट कशा बदलाल
सर्वात आधी आपल्याला जवळच्या बँकेत जावे.
बँकमध्ये जाऊन नोट बदली करण्यासाठी फॉर्म भरावा लागेल.
त्यानंतर हा फॉर्म २००० रुपये बदलीच्या काउंटरवर जमा करावा लागेल.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.