

प्रदूषणामुळे लहान वयातच केस पांढरे होऊ लागतात, ज्यामुळे वय अधिक दिसते. पांढरे केस लपवण्यासाठी अनेकजण बाजारातील रासायनिक उत्पादने वापरतात, परंतु त्याचा केसांवर वाईट परिणाम होतो. त्यामुळे लोक नैसर्गिक उपाय म्हणून मेंदीचा वापर करतात. मात्र, तुम्हाला कदाचित माहित नसेल की मेंदीचा सततचा वापर देखील केसांसाठी हानिकारक ठरू शकतो. अनेकांना मेंदीमुळे होणारे दुष्परिणाम माहिती नसतात. मेंदीमुळे केस कोरडे होणे, तुटणे आणि नैसर्गिक चमक कमी होणे यांसारखी नुकसानं होऊ शकतात. आज आम्ही तुम्हाला मेंदीचा योग्य वापर आणि त्याचे परिणाम समजावून सांगणार आहोत.
मेंदीचा वापर केल्याने केसांची नैसर्गिक आर्द्रता कमी होऊन ते कोरडे आणि निर्जीव होण्याची शक्यता असते, विशेषतः मेंदी जास्त वेळ केसांवर ठेवल्यास. वारंवार मेंदी लावल्याने केस पातळ, कमकुवत होऊ शकतात आणि तुटण्याचा धोका वाढतो. मेंदीचे मिश्रण योग्य प्रकारे तयार न केल्यास हा त्रास अधिक वाढू शकतो. त्यामुळे मेंदीचा योग्य उपयोग करणे आवश्यक आहे. जर तुम्ही केसांमध्ये मेंदी वापरत असाल, तर ती वेळेत तयार करावी आणि केसांवर लावताना वेळेची विशेष काळजी घ्यावी. त्यामुळे केसांचे आरोग्य टिकवणे सोपे होईल.
काही लोकांना मेंदीच्या घटकांवर ॲलर्जी असू शकते, ज्यामुळे टाळूवर खाज सुटणे, जळजळ होणे किंवा पुरळ येऊ शकतात. बाजारात विकल्या जाणार्या मेंदीमध्ये रंग आणि रसायनांचे मिश्रण असू शकते, जे ॲलर्जीची कारणीभूत ठरू शकते. त्यामुळे, अशा कोणत्याही समस्येपासून बचाव करण्यासाठी, मेंदी लावण्यापूर्वी पॅच टेस्ट करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. पॅच टेस्ट केल्यास तुम्हाला मेंदीमध्ये असलेल्या घटकांवर प्रतिक्रिया होईल का हे समजून घेता येईल. अशाप्रकारे, तुम्ही आपल्या त्वचेच्या सुरक्षिततेची काळजी घेऊ शकता आणि ॲलर्जी होण्याची शक्यता कमी करु शकता.
मेंदीचा वारंवार वापर केल्याने केसांचा नैसर्गिक रंग फिका होऊ शकतो. विशेषत: काळ्या केसांवर जास्त काळ मेंदी लावल्यामुळे लाल किंवा केशरी रंग येण्याची शक्यता असते. यामुळे तुमचे केस नैसर्गिक रंग गमावू शकतात. त्याचप्रमाणे, मेंदीचे वारंवार वापरामुळे केस तडफडतात आणि कोरडे होतात, ज्यामुळे ते अधिक तुटतात आणि अडकतात. काही वेळा केस इतके कमकुवत होतात की ते सहजपणे तुटून जातात. त्यामुळे, मेंदीचा वापर नियंत्रणात ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे, अन्यथा तुमच्या केसांवर त्याचा दुरागामी परिणाम होऊ शकतो.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.