Apple Store Opening : प्रतीक्षा संपली! भारतातील पहिल्या Apple Store चे उद्घाटन, Hello Mumbai च्या Tagline अंतर्गत स्वागत...

Apple Store In mumbai : 18 एप्रिल 2023 ला अॅपलचे भारतातील पहिले स्टोअर मुंबईतील वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC) येथे सुरू झाले आहे.
Apple Store Opening
Apple Store Opening Saam Tv

Apple's First Store In India : ऍपल, आयफोन आणि मॅकबुक बनवणारी अग्रगण्य अमेरिकन टेक कंपनीने भारतात आपले पहिले रिटेल स्टोअर उघडले आहे. 18 एप्रिल 2023 ला अॅपलचे भारतातील पहिले स्टोअर मुंबईतील वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC) येथे सुरू झाले आहे.

अहवालानुसार, अॅपलचे भारतातील (India) पहिले रिटेल स्टोअर हे कंपनीच्या आजपर्यंतच्या सर्वात चांगल्या स्टोअरपैकी एक आहे, जे ग्राहकांना उत्कृष्ट सेवा प्रदान करेल अशी आशा आहे. BKC (वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स) हे मुंबईतील सर्वात महत्त्वाचे स्थान आहे तसेच या ठिकाणी अनेक IT Sector च्या कंपनी देखील आहेत.

Apple Store Opening
Apple Logo: अॅपलचा लोगोमधला सफरचंद पूर्ण का नाही?

हे रिटेल स्टोअर उघडल्यानंतर अॅपलने भारतीय बाजारपेठेत (Market) ऑफलाइन एंट्री केली आहे. Apple ने घोषणा केली की ते 20 एप्रिल रोजी दिल्लीत मुंबई नंतर देशातील दुसरे स्टोअर उघडतील असे सांगितले.

अॅपलच्या स्टोअरबद्दल लोकांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण आहे. दुकानाबाहेर लोकांची मोठी रांग लागली आहे. या स्टोअरचे नाव Apple BKC आहे. वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स म्हणजेच बीकेसी हा मुंबईतील (Mumbai) एक व्यावसायिक आणि निवासी स्थान आहे.

Apple Store Opening
SSC & HSC Board Exam Result : दहावी-बारावीचा निकाल कधी लागणार ? महत्त्वाची माहिती आली समोर

देशातील काही महागड्या मालमत्तांसह हे एक मोठे उच्चस्तरीय व्यावसायिक केंद्र आहे. अॅपलचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) टिम कुक स्वतः स्टोअरच्या उद्घाटनप्रसंगी उपस्थित होते. यादरम्यान, स्टोअरचे उद्घाटन केल्यानंतर त्यांनी स्वतः ग्राहकांचे स्वागत केले आणि त्यांच्याशी संवाद साधला.

1. स्टोअरमध्ये उत्कृष्ट गोष्टी

APPLE ने 5 एप्रिल रोजी मुंबईतील JIO वर्ल्ड ड्राइव्ह मॉलमधील बॅरिकेडमधून आपल्या पहिल्या रिटेल स्टोअरचे अनावरण केले. मायानगरीच्या आयकॉनिक 'काली पीली' टॅक्सी कलेपासून प्रेरित, ऍपल बीकेसी क्रिएटिव्हमध्ये ऍपल उत्पादने आणि सेवांच्या श्रेणीसाठी डिझाइन समाविष्ट आहेत जे आमच्या ग्राहकांसाठी उपलब्ध असतील. स्टोअरच्या क्रिएटिव्हमध्ये 'हॅलो मुंबई' या क्लासिक अॅपव्ही ग्रीटिंगसह जाणाऱ्या लोकांचे उज्ज्वल स्वागत आहे. वृत्तानुसार, अॅपल यासाठी दरमहा सुमारे 42 लाख रुपये भाडे देणार आहे.

Apple Store Opening
Flipkart Summer Saver Days : स्वस्तात पण मस्त ! iPhone पासून Google Pixel पर्यंत हे स्मार्टफोन मिळताय कमी किंमतीत

कंपनीने एका निवेदनात म्हटले आहे की Apple ला भारतात २५ वर्षे पूर्ण झाल्याचा आनंद साजरा करत आहे. कंपनी या आठवड्यात देशातील पहिले Apple Store उघडून मोठ्या विस्तारासाठी सज्ज आहे. मुंबईनंतर अॅपलचे दुसरे अधिकृत स्टोअर 20 एप्रिल रोजी दिल्लीत सुरू होणार आहे.

अॅपलने सांगितले की, दोन्ही स्टोअरची रचना स्थानिक गरजांनुसार करण्यात आली आहे. 20,000 चौरस फुटांमध्ये पसरलेले, मुंबईतील स्टोअर ग्राहकांसाठी उघडण्याच्या एक दिवस आधी मीडियासाठी खुले केले गेले वृत्तानुसार कुक आपल्या भारत दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही भेट घेणार आहेत.

Apple Store Opening
Upcoming iOS Update : iOS 17 लवकरच होणार लॉन्च, मात्र अॅपलच्या या iPhones आणि iPads ला नाही करणार सपोर्ट

2. भारतात वेगाने वाढणारा कंपनी व्यवसाय

आयफोन, iPod आणि MacBook सारखे गॅजेट्स बनवणाऱ्या Apple साठी भारतीय बाजारपेठ खूप महत्त्वाची आहे. गेल्या काही तिमाहीत कंपनीच्या पारंपारिक बाजारपेठेतील मागणी मंदावली तेव्हा भारतीय बाजारपेठेत तेच्या उत्पादनांची मागणी झपाट्याने वाढली. ऍपलचे सीईओ टिम कुक यांनी अलीकडेच सांगितले की, भारतातील व्यवसाय पाहता, आम्ही तिमाही महसूल विक्रम आणि वर्षानुवर्षे अतिशय मजबूत दुहेरी अंकी वाढ केली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com