ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
अॅपलचा सर्वात पहिला लोगो १९७६ मध्ये रोनाल्ड वेन यांनी तयार केला.
ज्यामध्ये अॅपलचा पहिल्या लोगोत आयझॅक न्यूटन झाडाखाली पुस्तक वाचत बसलेला दाखवलेला आहे.
हाताने तयार केलेला या लोगोला विंटेज व जुना असल्याचा फिल येत होता. म्हणूनच हा लोगो स्टिव्ह जॉब्स यांना बदलण्याचा निर्णय घेतला.
यानंतर ग्राफिक डिझायनर रॉब यांनी इंद्रधनुष्य रंगानी भरलेला अॅपलचा लोगो डिझाईन केला.
या इंद्रधनुषी रंगाच्या लोगोचे अनेक तर्क वितर्क लावण्यात आले.
कृत्रिम बुद्धिमत्त चे जनक म्हणून ओळखले जाणारे अॅलन ट्युरिंग यांचा मुत्यू विषारी सफरचंद खाल्याने झाला असे म्हटले जायचे
अॅलन ट्युरिंग यांच्या मृतशरीराजवळ सायनाईडने माखलेलं अर्धवट खाल्लेल सफरचंद मिळालं होतं.
समलिंगी असल्यामुळे झालेल्या यातनेला कंटाळून त्यांनी आत्महत्या केली. या सत्य घटनेच्या आधारे प्रेरित होऊन तसेच LGBTQI समुदायाला ध्यानात घेऊन अॅपलचा लोगो अर्धा व इंद्रधनुषी आहे. असे काहीना वाटले.
यानंतर १९९८ ला हा लोगो पुन्हा बदलण्यात आला. रंगीबेरंगी लोगो बदलून न्यूनतम दृष्टीकोणाला साजेसा असलेला एकाच रंगाचा लोगो देण्यात आला.
याशिवाय जर पूर्ण सफरचंद हा लोगो मध्ये ठेवला असतेा तो चेरी फळ आहे असे देखील वाटले असते, आणि लोकांचा गोंधळ झाला असता.
अर्धा सफरचंद हा सर्वानाच माहित असल्याने अॅपलचा लोगो अर्धवट सफरचंद आहे.