Inhaled insulin: डायबेटीजग्रस्तांची इन्सुलिनच्या इंजेक्शनची कटकट संपणार; आता श्वासाद्वारे घेता येणार इन्सुलिन

Insulin inhalation treatment: मधुमेह रुग्णांसाठी इन्सुलिन इंजेक्शन घेणं ही रोजची त्रासदायक प्रक्रिया असते. मात्र आता वैद्यकीय संशोधनामुळे या रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे.
Insulin inhalation treatment
Insulin inhalation treatmentsaam tv
Published On

तुम्हाला मधुमेह म्हणजेच डायबेटीज असेल आणि रोज इन्सुलिन इंजेक्शन घेऊन तुम्ही कंटाळला असाल तर तुमच्यासाठी गोड बातमी आहे. ही बातमी म्हणजे इन्सुलिन आता सुईने नव्हे तर चक्क श्वासाद्वारेही घेता येणार आहे. मधुमेहाच्या रुग्णांसाठी हा मोठा दिलासा असणार आहे.

टाइप १ आणि टाइप २ मधुमेह असलेल्या लोकांमध्ये रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यासाठी इन्सुलिन दिले जाते. सध्या, इन्सुलिन इंजेक्शनच्या स्वरूपात येतं. सिप्ला कंपनीने भारतात इनहेलेबल इन्सुलिन अफ्रेझा लाँच करण्याची घोषणा केली आहे. सिप्लाचे ग्लोबल चीफ ऑपरेटिंग ऑफिसर यांनी या इन्सुलिनची वैशिष्ट्ये सांगितली आहेत.

Insulin inhalation treatment
Ovarian cancer: अंडाशयाच्या कॅन्सरचं मूळ कारण तज्ज्ञांनी काढलं शोधून; आता गंभीर आजार होण्यापूर्वीच मिळू शकणार उपचार

कसा घ्याल इन्सुलिनचा डोस ?

मॅनकाइंड कॉर्पोरेशन कंपनीने 2015 मध्ये अमेरीकेत 'अफ्रेझा' लाँच केलं. भारतात नुकतेच सेंट्रल ड्रग स्टँडर्ड कंट्रोल कॉर्पोरेशन (CDSCO) कडून 'अफ्रेझा'ला मान्यता मिळालीये. हे औषध एका लहान इनहेलर उपकरणाद्वारे सिंगल-यूज कार्ट्रिजमधून दिलं जातं. डॉक्टरांच्या निर्देशानुसार तुमचा डोस निवडायचा. तंत्रज्ञानाचा वापर करून पावडर केलेलं इन्सुलिन फुफ्फुसांमधून रक्तप्रवाहात वेगाने शोषलं जातं. त्यामुळेच हे इन्सुलिन पारंपारिक इंजेक्शनपेक्षा खूप जलद रक्तातील साखर नियंत्रण करते.

भारत मधुमेहाची राजधानी होण्याचा धोका आहे. कारण पुरुष, महिला दोघांमध्येही मधुमेहाचा धोका समान वेगाने वाढत आहे. गंभीर बाब म्हणजे लहान मुलांमध्येही याच प्रमाण वाढत चाललं आहे. भविष्यात देशात मधुमेहाचे 15 कोटी रुग्ण असण्याचा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे.

Insulin inhalation treatment
हात-पाय दुखतायेत? दुर्लक्ष करू नका, असू शकतात Lung Cancerची लक्षणं; वाचा तज्ज्ञांचे मत

भारतात 1 कोटी 10 लाख जण मधुमेहाने ग्रस्त आहेत. त्यापैकी 10 ते 15 टक्के लोकांना इन्सुलिन थेरपीची आवश्यकता आहे. मात्र यापैकी फक्त 40 टक्क्या पेक्षा कमी रुग्ण नियमित उपचार घेत आहेत. एका अंदाजानुसार भारतात इन्सुलिन वापरणाऱ्यांची संख्या अंदाजे 50 लाख 48 हजार इतकी आहे.

Insulin inhalation treatment
Cancer Treatment: गूड न्यूज! कॅन्सर कायमचा नष्ट होणार; तज्ज्ञांना मिळालं सोल्युशन

लहान-मोठ्या अनेक रुग्णांना इंजेक्शनची भिती वाटते. मात्र आता या इनहेलर इन्सुलिनमुळे डायबेटीजचं व्यवस्थापन करणे सोपं होणार आहे. खरतर आजार झाल्यावर उपचार घेण्यापेक्षा आधीच काळजी घेणे जास्त चांगले असते. म्हणूनच शरीरातील साखर वाढू नये यासाठी आहारवर नियंत्रण असणे, व्यायाम करणे तितकच गरजेचे आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com