मेटाचं लोकप्रिय चॅटिंग अॅप व्हॉट्सअॅपचा वापर प्रत्येक सर्वजण करत आहेत. काही युझर्स या चॅटिग अॅपचा वापर कार्यालयीन कामासाठी करत आहेत. कार्यालयाच्या टीममध्ये व्हॉट्स अॅपचा वापर करत सामूहिक सूचना दिली जाते. सर्वांना एकाचवेळी मेसेज मिळावा म्हणून बॉस या चॅटिग अॅपवर मेसेज पाठवत असतात. परंतु काहीजण हा मेसेज पाहतात आणि त्यावर काही रिप्लाय करत नाहीत. बॉसनं जर त्या मेसेजवरुन प्रश्न केला, तेव्हा मी मेसेज पाहिला नाही सर,असं सरळ खोटं बोलून अनेकजण काम टाळत असतात. (Latest News)
पण व्हॉट्सअॅपचं एक सेटिंग चालू केली तर कोणी तुमचा मेसेज पाहिला कोणी नाही याची माहिती मिळू शकणार आहे. बहुतेक वापरकर्त्यांना याची जाणीव नसेल, परंतु हे सत्य आहे. ग्रुपमध्ये पाठवलेल्या मेसेजवर लॉग प्रेस केलं तर कोणत्या सदस्याने मेसेज वाचला आहे, हे मेसेज इन्फोद्वारे कळू शकतं. तसेच या सेटिंगच्या मदतीने समोरील व्यक्तीने मेसेज कोणत्या वेळी वाचला याचीही माहिती आपल्याला मिळू शकते.
दरम्यान ही सेटिंग चालू केल्यास ग्रुपमधील कोणत्या व्यक्तीनं मेसेज वाचला. तसेच गरज असताना सुद्धा कोणी रिप्लाय केला नाही तेही आपल्याला कळू शकेल. जर उशिरा रिप्लाय केला तरी त्याची चोरी सापडणार आहे. कारण मेसेज कधी पाहिला याची माहिती आपल्याला मिळते. यामुळे उशिरा रिप्लाय का केला असा प्रश्न तुम्ही समोरील व्यक्तीला विचारू शकतात.
दुसरी मोठी गोष्ट म्हणजे व्हॉट्स अॅपची ही सेटिंग बाय डिफॉल्ट असते. म्हणजेच काय ही सेटिंग बंद करण्याचा पर्याय नाहीये. यामुळे तुम्हीही तुमच्या ऑफिसच्या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये असाल तर मेसेज आल्यानंतर रिप्लाय करा.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.