एक्सवरील सर्व युझर्स व्हॉट्सअॅपप्रमाणे ऑडिओ आणि व्हिडिओ कॉल करता येणार आहे. एक्सवरील सर्व युझर्स ऑडिओ आणि व्हिडिओ कॉलिंग फीचरचा लाभ घेऊ शकणार आहेत. आधी ही सुविधा फक्त प्रीमियम युझर्ससाठी देण्यात आली होती. या सुविधेचा लाभ घेण्यासाठी हे फीचर कशा प्रकारे इनबेल करण्याची प्रक्रिया जाणून घेऊ. (Latest News)
X चे सीईओ लिंडा याकारिनो यांनी एक पोस्ट शेअर करत या नव्या अपडेटची माहिती दिलीय. ही सुविधा नॉन-प्रिमियम युझर्ससाठी देण्यात आलीय. युझर्स या प्लॅटफॉर्मवर कोणतेही कॉल निवडण्याचा पर्याय निवडू शकतात. प्लॅटफॉर्मवर टू-फॅक्टर-ऑथेंटिकेशन देखील आहे. एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर कॉल करण्यासाठी मोबाईल नंबरची आवश्यकता नसणार आहे.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
एक्स प्रीमियम सेवा युझर्ससाठी पोस्ट एडिट करणं, लांब व्हिडिओ अपलोड करणं. व्हिरिफाइड बॅज आणि इतर प्रकारच्या सुविधा सुद्धा मिळणार आहे. हे नवीन फीचर्स आल्याने युझर्स मोफत ऑडिओ आणि व्हिडिओ कॉल करू शकणार आहेत.
असा करा इनबेल फीचर
तुमचा स्मार्टफोनमधील X हे अॅप्लिकेशन उघडा आणि मेसेजवर चिन्हावर क्लिक करा.
यानंतर तुम्हाला सेटिंग्ज आयकॉनवर टॅप करावे लागेल. येथे ऑडिओ आणि व्हिडिओ कॉलिंग इनबेल करण्याचा पर्याय दिसेल.
या टॉगलवर क्लिक करून त्याला सुरू करावे. सुरू झाल्यानंतर ऑडिओ आणि व्हिडिओने कॉल करू शकतो.
यासह इतर अनेक पर्याय देखील तेथे असतील. ते तुम्ही निवडू शकतात.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.