Reel Addiction : तुम्हालाही सतत रील्स बघण्याची सवय आहे? ५ गोष्टी लक्षात ठेवा, मोबाईलपासून राहालं दूर

Social Media : सध्या सोशल मीडियावर रील्सचा जमाना आहे. प्रवासाच्या वेळी किंवा रिकाम्या वेळी विरंगुळा म्हणून इन्स्टाग्रामवर रील्स हमखास पाहिले जातात. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत अनेकजण फोन चाळत बसतात.
Reel Addiction
Reel AddictionSaam Tv
Published On

How To Get Rid Of Addiction Of Scrolling :

सध्या सोशल मीडियावर रील्सचा जमाना आहे. प्रवासाच्या वेळी किंवा रिकाम्या वेळी विरंगुळा म्हणून इन्स्टाग्रामवर रील्स हमखास पाहिले जातात. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत अनेकजण फोन चाळत बसतात.

फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर अशा अनेक सोशल मीडिया अॅप्सचा आपण रोज वापर करत असतो. हल्ली याचे व्यसन अधिक प्रमाणात वाढले आहे. लहान मुलांपासून ते वयोवृद्धापर्यंत अनेकांना रील्स (Reels) पाहाण्याची आवड असते. कोणत्याही ठिकाणी व्हिडिओ स्क्रोल करण्याची सवय आहे का? त्याचा आपल्या शरीरावर (Health) आणि मनावर विपरीत परिणाम होतो. ही सवय अधिक प्रमाणात वाढत असेल तर यापासून दूर कसे राहाल त्यासाठी या ५ गोष्टी लक्षात ठेवा.

1. स्क्रोलिंग करण्यावर मात कशी कराल?

  • जर तुम्हाला कंटाळा आला असेल आणि स्क्रोल करत असाल तर त्याऐवजी संगीत ऐका, फिरायला जा, तसेच तुम्हाला आवडणाऱ्या गोष्टी करु शकता. पुस्तक वाचू शकता.

  • तसेच तुम्ही तुमच्या जवळच्या व्यक्तीशी बोलू शकता. मित्रांना किंवा नातेवाईकांना कॉल (Call) करा. वर्कआउट किंवा योगा क्लास लावा.

  • टाइमपास म्हणून स्क्रोल करत असाल तर लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये जाण्याचा प्रयत्न करा, बागकाम करा किंवा वॉकला जा.

  • सततच्या स्क्रोलिंगमुळे तुमच्या मनावर ताण येतो. तुम्ही अतिविचार करु लागता. तुमचा फोकस कमी होतो.

  • सतत फोन पकडल्याने मान आणि बोटे दुख लागतात. तसेच इतर अनेक प्रकारच्या समस्या देखील उद्भवतात. त्यासाठी फोन स्क्रोलिंग करण्याचा टाइम सेट करा.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com