Teachers Day 2025: शिक्षक दिन करा स्पेशल, तुमच्या शिक्षकांना अन् गुरुंना द्या 'या' खास शुभेच्छा

Teachers Day 2025 Wishes: आई-वडिलानंतर आयुष्यातील सर्वात महत्वाची व्यक्ती म्हणजे शिक्षक. या शिक्षकदिनी त्यांचे आभार मानण्यासाठी या खास शुभेच्छा नक्की द्या.
teachers day
teachers daygoogle
Published On

दरवर्षी ५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिन (Teachers Day) साजरा केला जातो. ५ सप्टेंबर १८८८ रोजी, माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म झाला. यांच्या जयंतीनिमित्त शिक्षक दिन साजरा केला जातो. दुसरे राष्ट्रपती असण्यासोबतच ते एक आदर्श शिक्षक, विद्वान आणि तत्वज्ञानी देखील होते. शिक्षण केवळ व्यक्तीच नाही तर एक मजबूत समाज देखील घडवते. शिक्षक हे आपल्या जीवनातील असे दिवे आहेत, जे आपल्या ज्ञानाने आपल्या जीवनातील अंधार दूर करतात.

शिक्षक दिन हा शिक्षकांबद्दल आदर आणि कृतज्ञता व्यक्त करण्याचा एक महत्त्वाचा दिवस आहे. हा दिवस गुरूंच्या सन्मानार्थ साजरा केला जातो. कोणत्याही व्यक्तीच्या यशामागे गुरूंचा मोठा हात असतो. यासाठी विद्यार्थी आपल्या शिक्षकांना भेटवस्तू किंवा खास कार्ड देऊन त्यांना शुभेच्छा देतात. लहानापासून ते मोठ्यापर्यंत सगळेच आपल्या शिक्षकांना या दिवशी खास शुभेच्छा देतात. शिक्षक दिनाच्या खास प्रसंगी, तुम्ही या कोट्स आणि शुभेच्छा देऊन गुरूंचे आभार मानू शकता.

शिक्षक दिनानिमित्त तुमच्या शिक्षकांना आणि गुरुंना द्या या खास शुभेच्छा

आपल्या स्वप्नांना पंख देणाऱ्या आणि आपले जीवन उजळवणाऱ्या अशा शिक्षकांना आपण नेहमीच सलाम करतो. शिक्षक दिनाच्या शुभेच्छा!

तू मला प्रत्येक अडचणीशी झुंजायला आणि प्रत्येक स्वप्न पूर्ण करायला शिकवलंस. तुझ्याशिवाय हा प्रवास अपूर्ण होता. नेहमीच धन्यवाद. शिक्षक दिनाच्या शुभेच्छा!

आपल्याला चांगले मानव बनवणाऱ्या शिक्षकाचे मनापासून आभार. शिक्षक दिनाच्या शुभेच्छा!

गुरु तो नसतो जो आपल्याला पुस्तकांमधून गोष्टी लक्षात ठेवायला लावतो, गुरु तो असतो जो आपल्याला जीवन कसे जगायचे हे शिकवतो. तुम्हाला शिक्षक दिनाच्या शुभेच्छा!

मी वाकड्या रेषा काढायचो, तू मला पेन कसे वापरायचे ते शिकवलेस. माझ्या मनात ज्ञानाचा दिवा लावून तू अज्ञानाचा अंधार दूर केलास. शिक्षक दिनाच्या शुभेच्छा.

teachers day
Sleep Paralysis: स्वप्नात ओरडूनही आवाज का येत नाही? जाणून घ्या वैज्ञानिक कारण

शिक्षक दिनानिमित्त पाठवा हे खास कोट्स

खरे शिक्षक तेच असतात जे आपल्याला स्वतःसाठी विचार करण्यास मदत करतात.

एक चांगला शिक्षक नेहमीच त्याच्या विद्यार्थ्याला आयुष्यात काहीतरी मोठे करण्यासाठी आणि एक चांगला माणूस बनण्यासाठी प्रेरित करतो.

शिक्षक आपल्या जीवनातील एक अनमोल रत्न आहे जो अंधारातही प्रकाश आणतो.

पुस्तकी ज्ञानाच्या पलीकडे, एक शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांना जीवनातील सर्व आव्हानांवर मात करण्याचे धाडस शिकवतो.

शिक्षक केवळ अक्षरेच शिकवत नाहीत तर जीवनाची मूल्ये देखील शिकवतात.

teachers day
Netflix Trending Films: नेटफ्लिक्सवर ट्रेंड होताहेत 'हे' सुपरहिट चित्रपट; भारतीय सिनेमाचांही समावेश, वाचा यादी

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com